Papaya Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Market : खानदेशात पपई आवक वाढू लागली

Papaya Rate : खानदेशात पपईदरांचा तिढा यंदाही सुरू आहे. सध्या १८ ते २० रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पपईदरांचा तिढा यंदाही सुरू आहे. सध्या १८ ते २० रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळत आहे. शेतकऱ्यांना कमी दर दिले जात असून, २५ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळावा, अशी मागणी होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पपई आहे. त्यात शहादा तालुक्यात चार हजार हेक्टर एवढे पपईचे क्षेत्र आहे. पपईची लागवड धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर भागांतही झाली आहे. दर महिन्यागणिक कमी झाले आहेत. सुरुवातीला शिवार खरेदीत किंवा थेट जागेवर ३० रुपये प्रतिकलोचे दर मिळाले. नंतर २५ रुपये व सध्या १८ ते २० रुपये प्रतिकिलोचा दर आहे.

ऑगस्टच्या अखेरीस २० रुपये प्रतिकिलोचा दर होता. या महिन्यात १८ ते २० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्चानुसार हा दर परवडत नसल्याची स्थिती आहे. सध्या किमान २५ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळावा. यासंबंधी मध्यंतरी शहादा, शिरपूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पपई काढणीस विरोध केला होता.

खरेदीदार धुळे, नंदुरबार, राजस्थान, दिल्लीतील आहेत. शहादा, शिरपूर येथेही अनेक एजंट आहेत. ही मंडळी शेतकऱ्यांच्या अडचणीचा लाभ घेते आणि दर कमी करते, असा आरोप होत आहे. शहादा, शिरपूर, चोपडा येथील बाजार समिती, संबंधित सहायक निबंधक यांनी एक बैठक घ्यावी. शेतकरी, व्यापारी, एजंट यांना बैठकीत बोलवून चर्चा करावी, अशी मागणी होत आहेत.

‘उठाव असताना, दर कमी का?’

पपईला उत्तरेकडे उठाव आहे. सध्या आवक प्रतिदिन १२ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी खानदेशात आहे. ही आवक मागील महिन्यात सरासरी आठ ट्रक एवढी होती. ही आवक शहादा भागात अधिक आहे. उठाव असताना दर कमी का, असा मुद्दा उपस्थित करीत आहेत. खरेदीदार दर्जा व अन्य कारणे सांगून शेतकऱ्यांची कोंडी करीत असल्याचा मुद्दा करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT