Hapus Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango : वाशीत हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक वाढली

Mango Production : दरात दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत घट

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Mango Season : रत्नागिरी ः उन्हाचा कडाका वाढल्यानंतर मार्चच्या अखेरीस आणि एप्रिललच्या सुरुवातीला वाशी बाजार समितीमध्ये हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. सलग चार दिवस ५० ते ५५ हजार पेट्या दाखल झाल्या होत्या. तर मागील दोन दिवसांत ३७ हजार पेट्या बाजार समितीत आल्या आहेत. आवक वाढल्यामुळे पेटीचे दर दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा उष्मा अधिक जाणवत आहे. तपमानाचा पारा ३७ अंशांवर गेला होता. त्यामुळे झाडावरील फळे वेगाने तयार होत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाच डझनाच्या पेटीचा दर साडेचार हजार रुपयांपर्यंत होता. तो पुढे कमी होत गेला. २६ मार्चला कोकणातून ३६ हजार पेटी आंबा वाशी बाजार समितीत दाखल झाला होता. त्यानंतर २७ रोजी त्यात मोठी वाढ झाली. ५४ हजार ०५७ पेट्या कोकणातून पाठविण्यात आल्या होत्या. सलग चार दिवस त्या टप्प्यातच पेट्या जात होत्या.

सोमवारी (ता. १) ६४ हजार पेटी आंबा बाजारात दाखल झाल्याचे वाशी बाजार समितीमधून सांगण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (ता. २) ४२ हजार, बुधवारी (ता. ३) ३८ हजार आणि गुरुवारी (ता. ४) ४२ हजार पेट्या दाखल झाल्या. यंदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांत मोठ्या प्रमाणात आवक बाजारात होती. सुरुवातीला दर अधिक असल्यामुळे ग्राहकांकडून मागणीही कमी असते. निर्यातही सुरू झालेली नसते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात आल्याने त्याचा दरावर परिणाम होतो, असे वाशीतील व्यावसायिकांचे मत आहे. पहिल्या बहरातील आंबा संपुष्टात आला असून आता १० ते १५ एप्रिलपर्यंत पेट्यांची संख्या कमी राहील, असा अंदाज बागायतदारांकडून वर्तविला जात आहे. दर चांगला मिळत असल्यामुळे काही बागायतदारांकडून कमी दर्जाची किंवा कोवळी फळे पाठविल्याचे प्रकारही पुढे आले होते. हा टक्का अधिक राहिल्यामुळे त्याचा परिणाम दरावर होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंबा चांगला आहे. फेब्रुवारीमध्ये कोकणातून अधिक पेट्या वाशी बाजारात पाठविल्या गेल्या होत्या. मार्चमध्येही तशीच स्थिती आहे. बहुसंख्य बागायतदारांनी गेल्या काही दिवसांत आंबा बाजारात पाठविण्यास सुरुवात केली आहे.
- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT