landslides Anuskura Ghat Agrowon
ॲग्रो विशेष

landslides Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटात यंदा तिसऱ्यांदा कोसळली दरड; कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प

Anuskura Ghat News : यंदाच्या पावसाळ्यामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळल्याने वाहतूक टप्प झाली आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रत्नागिरी-राजापूर जवळचा अणुस्कुरा घाटातील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. येथे शनिवारी (ता. २४) पहाटे दरड कोसळली असून बांधकाम विभागाच्या माध्यमातून जेसीबी लावून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. 

रत्नागिरी-राजापूर जवळचा अणुस्कुरा घाटात सध्या पावसाचा जोर असून येथे सलग दोन ते तीन दिवस पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली असून सध्या दगड आणि माती रस्त्यावर आली आहे. 

रस्त्यावर दगड माती आल्याने कोल्हापुरकडे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवण्यात आली आहे. तसेच कोल्हापुरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अणुस्कुरा घाट महत्वाचा असून तो जलद वाहतुकीसाठी वापरला जातो. या आघाटमुळे प्रवासाच्या वेळेबरोबरच इंधानाचीही बचत होते. मात्र पहाटे येथे दरड कोसळल्याने वाहनांच्या रांगा लागलेल्या असून वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान यंदाच्या पावसाळ्यामध्ये अनुस्कुरा घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळली. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.  याआधी जून महिन्यात अशाच प्रकारे दरड कोसळली होती. मुसळधार पावसामुळे १३ जून रोजी घाटात दरड पडून कोल्हापुरशी संपर्क तुटला होता. त्यावेळी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तर जेसीबीबरोबर ब्लास्टींग मशीनचा वापर करून दरड बाजूला करण्यात आली होती. 

तर घाटात सुरक्षित वाहतुक होण्यासाठी धोकादायक स्थळांची पाहणी करण्यात येणार असल्याचे राजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तसेच धोकादायक स्थळांची ठिकाणी उपाय योजना केल्या जातील, त्यासाठी नागरीकांसह प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT