Water Contamination Agrowon
ॲग्रो विशेष

Water Contamination : दूषित पाण्याचे प्रमाण वाढले

Contaminated Water Supply : पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. थंडीचे प्रमाण सतत कमी-जास्त होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरात चालणाऱ्या क्रियांवर होतो.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्याच्या ग्रामीणसह शहरी भागातील दवाखाने सध्या रुग्णांच्या गर्दीने फुलून गेलेले दिसत आहे. यात पाणीजन्य आजारांचे मोठे प्रमाण दिसून येत आले आहे. साथीच्या रोगांना आवर घालण्यासाठी शुद्ध व पिण्यायोग्य पाणी हवे असताना काही ठिकाणी दूषित पाणी प्यायल्याने हे आजार नियंत्रणात यायला विलंब लागतो आहे. जिल्ह्यात केलेल्या पाहणीत वेगवेगळ्या ठिकाणांहून १८१२ पाण्याच्या नमुन्यांपैकी १६९ पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले. त्यात २४ नमुने शहरी भागातील आहेत.

पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. थंडीचे प्रमाण सतत कमी-जास्त होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरात चालणाऱ्या क्रियांवर होतो. आपली पचनशक्ती तसेच रोगप्रतिकारशक्ती मंदावते. पावसाळ्यात अशुद्ध पाण्याचे प्रमाण तसेच दूषित अन्नाचे प्रमाण वाढलेले असते. दूषित पाणीपुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

विहीर, बोअर, पंप यासह इतर जलस्रोतांमधून दूषित पाणीपुरवठा होतो. दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, टायफॉईड अशा आजारांना निमंत्रण मिळते. दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. मागील महिन्यात जिल्ह्यातील ८५० गावांमधून १ हजार ८१२ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १६९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरावे,.

दूषित पाणी पिल्याने काही लक्षणे जाणवत असल्यास तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणे गरजेचे आहे, असा सल्ला प्रशासनाकडून दिल्या जात आहे. पाणी नमुने तपासणीसाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला आता कीट देण्यात आल्या आहेत. ज्या आरोग्य केंद्र परिसरातील पाणी नमुने दूषित आढळतात त्यांना तातडीने पत्र देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून संबंधितांना पत्र दिले. जलस्रोतापासून १० ते १५ मीटर परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.

तालुकानिहाय दूषित नमुने

अकोला २६

बार्शीटाकळी १९

अकोट ४०

तेल्हारा ११

बाळापूर २

पातूर ३१

मूर्तिजापूर १६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT