Agri Expo 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Agriculture Exhibition : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचे पर्वणी ठरणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी भव्य प्रदर्शन आज (ता. १८) सांगली-मिरज रस्त्यालगत असणाऱ्या अंबाबाई तालिम संस्थेच्या मैदानात प्रदर्शनाचे मोठ्या दिमाखात उद्‌घाटन सोहळा होणार आहे.

Team Agrowon

Sangli News : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचे पर्वणी ठरणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी भव्य प्रदर्शन आज (ता. १८) सांगली-मिरज रस्त्यालगत असणाऱ्या अंबाबाई तालिम संस्थेच्या मैदानात प्रदर्शनाचे मोठ्या दिमाखात उद्‌घाटन सोहळा होणार आहे. ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनाच्या तंत्रज्ञानाचा सोहळा रंगणार आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रप्रणाली, सोपे प्रयोग, नवी साधने याची माहिती मिळणार आहे.

निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘सकाळ-ॲग्रोवन ॲग्री एक्स्पो २०२४’चे पॉवर्ड बाय गोदरेज ॲग्रोवेट, नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा. लि, मे. बी. जी. चितळे डेअरी, भिलवडी आहेत. तर धानुका ॲग्रीटेक लि, व आयडियल ॲग्री सर्च प्रा. लि. व वारणा सहकारी दूध संघ हे सहप्रायोजक आहेत. किसान ड्रोन गिफ्ट पार्टनर तर रेडिओ पार्टनर बिग एफएम आहेत. सांगली-मिरज रस्त्यालगत असणाऱ्या अंबाबाई तालीम संस्थेच्या मैदानात सोमवारपर्यंत (ता. २१) प्रदर्शन असणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शेतकऱ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी सुरू राहणार आहे.

लकी ड्रॉद्वारे ड्रोन जिंकण्याची संधी

या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना लकी ड्रॉद्वारे एक जीईएनपीएस सोल्यूशन्स कंपनीचा डीजीसीए मान्यता प्राप्त ॲग्रोन-x किसान ड्रोन जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. लकी ड्रॉमधील विजेत्यास शासकीय नियमाप्रमाणे बक्षीस कर भरणे व ड्रोन पायलट प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ड्रोनचे वितरण करण्यात येईल. शुक्रवार (ता. १८) ते सोमवारपर्यंत (ता. २१) दुपारी तीनपर्यंत जमा झालेल्या प्रवेशिकामधून लकी ड्रॉची सोडत होईल. लकी ड्रॉ विजेत्या शेतकऱ्याचे नाव ‘ॲग्रोवन’मधून प्रसिद्ध केले जाईल.

‘ॲग्रो- संवाद’ चर्चासत्राचे विषय

ता.१९ ऑक्टोबर (शनिवार)

विषय : ऊस उत्पादन वाढीची सूत्रे

वेळ : दुपारी १२ ते १.३०

वक्ते :

१) डॉ. अशोककुमार पिसाळ, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडापार्क, कोल्हापूर

२) विकास निकम, नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली (एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT