Agriculture University Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत आचार्य पदवीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

Admission Process : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत आचार्य पदवी अभ्यासक्रम २०२४-२५ साठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २९ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत आचार्य पदवी अभ्यासक्रम २०२४-२५ साठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २९ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ही माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेच्या वतीने देण्यात आली.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या माहितीनुसार, राज्याच्या कृषी विद्यापीठांत ९ विद्याशाखांमध्ये आचार्य पदवी अभ्यासक्रम शिकवण्यात येतो. यामधील कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, मत्स्यशास्त्र, अन्नतंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी आणि काढणीपश्‍चात व्यवस्थापन आदी विद्याशाखांचा समावेश आहे.

राज्यात या अभ्यासक्रमांची सुमारे १८ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत तीन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत पाच, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चार आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सहा महाविद्यालयांचा समावेश आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत काढणीपश्‍चात व्यवस्थापन हा नवीन आचार्य पदवी अभ्यासक्रम विविध विषयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाला आहे. चारही कृषी विद्यापीठांतर्गत आचार्य पदवी अभ्यासक्रमाची एकूण प्रवेश क्षमता २६४ विद्यार्थी प्रतिवर्ष इतकी आहे.

महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाकडून आचार्य पदवी अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या ७० टक्के गुण आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेतील ३० टक्के गुण विचारात घेऊन उमेदवाराची प्रवेश क्षमता निश्‍चित करण्याची कार्यपद्धती यासाठी अवलंबली जाते.

आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान ६.० सीजीपीए आणि खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान ६.५ सीजीपीए असे गुण अनिवार्य आहेत. याशिवाय उमेदवाराचे संशोधन लेख प्रसिद्ध झाले असल्यास एका संशोधन लेखाकरिता ०.०५ गुणाचा अधिभार देण्यात येतो. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

या अंतर्गत https://phd.agrimcaer.in या संकेतस्थळावर प्रवेश इच्छुक उमेदवार आणि नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करतेवेळी उमेदवाराने वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अधिभार, प्रवर्ग विषयक माहिती भरून त्याच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करावयाची आहेत.

ऑनलाइन प्रवेश अर्ज संकेतस्थळावर दाखल करण्याची मुदत १० डिसेंबरपर्यंत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार अंतरिम गुणवत्ता यादी १२ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध होईल. याबाबत हरकती दाखल करण्यासाठी १३ ते १६ डिसेंबर हा कालावधी असेल. उमेदवारांच्या हरकती विचारात घेऊन १८ डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तीन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. उमेदवारांची गुणवत्ता, आरक्षित प्रवर्ग आणि उमेदवाराने दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन प्रथम व द्वितीय प्रवेश फेरी राबविण्यात येईल. उर्वरित तिसरी प्रवेश फेरी संबंधित महाविद्यालय किंवा प्रवेश प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी ५ व ७ जानेवारी २०२५ रोजी राबविण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक व प्रवेश माहिती पुस्तिका https://phd.agrimcaer.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचेही महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने कळविले आहे.

विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरिल प्रवेश माहिती पुस्तिकेतील सूचना विचारात घेऊन ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
डॉ. हरिहर कौसडीकर, संचालक (शिक्षण), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT