Soybean Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean : सोयाबीनच्या ३५ एकर पिकाला शेंगाच नाहीत

शेतकऱ्यांचे नुकसान; बियाणे कंपनीवर कारवाईची मागणी

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

परभणी ः यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या ३५ एकरांवरील सोयाबीन पिकाला (Soybean Crop) शेंगाच लागल्या नाहीत. या प्रकरणी बियाणे कंपनीविरुद्ध कारवाई करावी. नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नाथ्रा (ता. पाथरी) येथील आठ शेतकऱ्यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली.

या संदर्भात पाथरी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी बी. बी. खरात यांच्याकडे या शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. नाथ्रा येथील अनिल बालासाहेब वाकणकर आणि वसंतराव रंगनाथराव वाकणकर यांनी माजलगाव (जि. बीड) येथील कृषी विक्रेत्यांकडून सोयाबीन बियाणे खरेदी करून नाथ्रा येथील गट क्रमांक १०९ मधील १५ एकर जमिनीवर पेरणी केली. सोयबीन पिकाची वाढ झाली. परंतु शेंगा लागल्या नाहीत.

गट क्रमांक ११० आणि १११ मधील सुनीता वाकणकर, कीर्ती टाले यांच्या १२ एकरांवरील सोयाबीनला, तसेच गट क्रमांक १११ मधील विशाल वाकणकर, आशा वाकणकर, विश्‍वजित वाकणकर यांच्या ८ एकरांवरील सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत, अशी तक्रार केली आहे. सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संबंधित बियाणे उत्पादक कंपनीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तालुका प्रशासन, कृषी विभागाकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT