ॲग्रो विशेष

Livestock Census : कोल्हापूर जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान होणार २१ वी पशुगणना

Animal : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान पशुगणनेचे काम केले जाणार आहे.

sandeep Shirguppe

Livestock census Kolhapur : सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान २१ वी पशुगणना होणार आहे. जिल्हा पशुधन उपायुक्तांची जिल्हा पशुगणना अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे. महापालिका क्षेत्र वगळून ही पशुगणना केली जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

२०१९ नंतर २१ वी पशुगणना करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान पशुगणनेचे काम केले जाणार आहे. पशुगणनेअंतर्गत माहितीचे संकलन आणि छाननी ही विकसित मोबाईल अॅपद्वारे केली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ग्रामीण भागातील तीन हजार कुटुंबांसाठी एक आणि शहरी भागातील चार हजार कुटुंबांसाठी एक प्रगणक या प्रमाणात नेमणूक केली जाणार आहे. ग्रामीण भागातील पाच प्रगणकांमागे एक, तर शहरी १० प्रगणकांमागे प्रत्येकी एका पर्यवेक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

कागल पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाला मिळाला असून, त्याप्रमाणे पशुसंवर्धन विभागाने नियोजन सुरू केले आहे. तालुक्यातील पशुगणनेकरिता १६ प्रगणकांची नेमणूक केली आहे. चार महिने हे काम चालणार असून, तंतोतंत माहिती संकलित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT