Farmer File Photo Agrowon
ॲग्रो विशेष

Faridkot Farmer: पंजाबमधील फरीदकोटमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव; शेतकरी आक्रमक

Police in Faridko : पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप झाला आहे आणि त्यांनी केंद्र व पंजाब सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करत आहेत. यावरून पोलिसांनी मात्र कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला.

Dhananjay Sanap

Farmer aggressive protests : शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या गावात फरीदकोटमध्ये गुरुवारी (ता.२०) पोलिस आणि शेतकरी यांच्यात तणाव निर्माण झाला. शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ५४ वर आंदोलन सुरू केल्यावर पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. फरीदकोट जिल्ह्यात विविध स्थानांहून सुमारे ६०० शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यात महिलाही आहेत. यामध्ये भारतीय किसान युनियन एकता सिद्धपुर डल्लेवाल गटाचे शेतकऱ्यांची संख्या आधिक आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप झाला आहे आणि त्यांनी केंद्र व पंजाब सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करत आहेत. यावरून पोलिसांनी मात्र कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला.

जो कोणी महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न करेल, त्याला अटक केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत महामार्ग बंद होऊ दिला जाणार नाही आणि सामान्य नागरिकांना त्रास होऊ देऊ नका. असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.

तर शेतकऱ्यांनी मात्र पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, पंजाब सरकारने रात्री केलेली कारवाई अत्यंत निंदनीय आहे. डल्लेवाल यांना आंदोलनाच्या ठिकाणावरून उचलल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. तसेच ५०० ते ६०० शेतकऱ्यांना अटक केल्याची बातमी किसान तकने दिली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी या कारवाईचे स्पष्टीकरण दिले. फरीदकोट येथील डीएसपी नतरलोचन सिंग यांनी किसान तकला सांगितलं की, "गुरुवारी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग बंद केला. त्यांना आधी इशारा देण्यात आला होता, पण त्यांनी रस्ता सोडला नाही. सरकारच्या सूचनेनुसार, आम्ही कायदेशीर कारवाई केली आणि त्यांना ताब्यात घेतले.' असंही सांगितलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Fourth List: कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Fodder Self Sufficiency: दुष्काळात तोंगलाबादचा ‘चारा स्वयंपूर्णतेचा आदर्श ‘पॅटर्न’

Village Development Committees: स्थापन करा दुष्काळ आकलन, निवारण ग्रामविकास समिती

Farmer Issue: दुष्काळातही शेतकऱ्यांवर अन्याय!

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

SCROLL FOR NEXT