Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकऱ्यांचे पीकविम्याचे दहा कोटी बँकांत पडून

Bank Issue : बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्याने तसेच बॅंक खात्यासंबंधित तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७६० शेतकऱ्यांचे साडेदहा कोटी रुपये अद्यापही बॅंकांमध्येच पडून आहेत.

Team Agrowon

Solapur News : पावसाचा मोठा खंड पडल्याने जिल्ह्यातील मागच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार त्या वेळी भरपाईपोटी विमा कंपनीकडून दोन लाख १० हजार शेतकऱ्यांना खरीप पीकविम्याचा २५ टक्के अग्रिम मिळाला.

मात्र बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्याने तसेच बॅंक खात्यासंबंधित तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७६० शेतकऱ्यांचे साडेदहा कोटी रुपये अद्यापही बॅंकांमध्येच पडून आहेत.

ऐन पावसाळ्यातच पावसाचा सलग २१ दिवसांपेक्षा अधिक खंड पडला आणि खरीप पिकांनी माना टाकल्या. संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविम्याचा २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना काढली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यातून आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ७० हजार शेतकऱ्यांना १०३ कोटी रुपयांचा पीकविम्याचा अग्रिम मिळाला. सोयाबीन, बाजरी, मका या पिकांसाठी तो अग्रिम आहे.

आधार प्रमाणीकरण करावे

अग्रिमचे दहा कोटी ६६ लाख रुपये अजूनही बॅंकांमध्येच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून आहेत. या शेतकऱ्यांना आता ज्या राष्ट्रीयीकृत बॅंकेत त्यांचे खाते आहे, त्या ठिकाणी जाऊन आधार प्रमाणीकरण किंवा खात्यासंबंधीची अडचण दूर करावी लागेल. त्याशिवाय ही रक्कम मिळणार नाही, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीकनिहाय अग्रिम न मिळालेले शेतकरी

सोयाबीन उत्पादक १२,७००

बाजरी ६,८५०

मका १३,२१०

एकूण ३२,७६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT