Rising Heat Agrowon
ॲग्रो विशेष

Rising Heat Crop Damage : तापमान चढउतारामुळे खानदेशात पिकांची अवस्था गंभीर

Climate Change Impact : खानदेशात गेले तीन दिवस अंशतः ढगाळ वातावरण आहे. ऊन वाढत आहे. दुपारी उकाडा वाढला आहे. परिणामी उन्हाळ पिकांसह केळीला पाण्याची अधिकची गरज निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात गेले तीन दिवस अंशतः ढगाळ वातावरण आहे. ऊन वाढत आहे. दुपारी उकाडा वाढला आहे. परिणामी उन्हाळ पिकांसह केळीला पाण्याची अधिकची गरज निर्माण झाली आहे. रात्रीचे तापमान कमी होत आहे. विषम वातावरणामुळे पिकांना फटका बसत आहे.

केळीच्या मोठ्या बागेला सध्या प्रति दिन प्रति झाड २५ लीटर पाणी द्यावे लागत आहे. तर लहान किंवा सात ते आठ महिन्यांच्या केळी बागेला प्रति दिन प्रति झाड २० ते २२ लीटर पाणी द्यावे लागत आहे.

उष्णता किंवा कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यात गेले तीन दिवस सतत अंशतः ढगाळ वातावरण आहे. दुपारी उष्णता वाढते. उकाडा सायंकाळपर्यंत कायम राहत आहे. यामुळे वाफसा कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

सध्या मका, ज्वारी, बाजरी आदी पिके मळणीचे काम सुरू आहे. तर कलिंगड, खरबूज व इतर भाजीपाला पिकेही आहेत. पिकांनाही सिंचनासंबंधी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. कारण विषम स्थितीत सिंचनासंबंधी अडचणी येत आहेत. त्यात मध्येच वीजपुरवठा खंडित झाल्यास सिंचनाचे काम ठप्प होते.

शेतकऱ्यांना विजेची प्रतीक्षा करावी लागते. सध्या सकाळपासून ढगाळ वातावरण राहते. सकाळी ११ नंतर उकाडा वाढण्यास सुरुवात होत आहे. याचा फटका केळी बागांना अधिक बसत आहे. कारण सायंकाळनंतर थंडी असते. यात बुरशीजन्य रोग सक्रिय होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT