Weather Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा घसरला

Summer Heat : शहरासह जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, दुपारनंतर मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे उष्णतेचा पारा हळूहळू खाली येऊ लागला आहे.

Team Agrowon

Pune News : शहरासह जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, दुपारनंतर मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे उष्णतेचा पारा हळूहळू खाली येऊ लागला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २१) शहरातील पारा ४० अंशाच्या खाली गेला असून, जिल्ह्यात सर्वाधिक कमाल ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शिरूर तालुक्यात झाली.

आठवड्याच्या सुरुवातीलाच पुण्यातील उन्हाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. तब्बल ४३.५ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेल्याने अंगाची लाहीलाही झाली होती. अशा परिस्थितीत नागरिक घराबाहेर पडेनासे झाले होते.

मात्र, हवामानातील बदलामुळे तीन ते चार दिवसांपासून शहरांसह जिल्ह्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेतील गारवा वाढला असून, परिणामी कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ४३ अंशांवर पोहोचलेले कमाल तापमान दोन दिवसांनंतर ४० अंशांपर्यंत खाली आले आहे. तर शहराच्या बहुतांश भागातील कमाल तापमान ३९ अंशांच्या खाली गेल्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे.

मात्र, उकाडा वाढला असून, रात्री हवेत गारवा असल्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात आकाश निरभ्र राहील. दुपारनंतर आकाश ढगाळ, तर काही भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या केंद्रांवरील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

तळेगाव ढमढेरे ४०.६, शिरूर ४०.६, राजगुरूनगर ४०.२, वडगावशेरी ४०.१, पुरंदर ४०.१, हडपसर ३९.६,कोरेगाव पार्क ३९.५, चिंचवड ३९.२, खेड ३८.९, मगरपट्टा ३८.७, लव्हळे ३८.५, इंदापूर ३८.५, एनडीए ३७.९, दौंड ३७.९, शिवाजीनगर ३७.८, तळेगाव ३७.७, बारामती ३७.७, पाषाण ३७.४, आंबेगाव ३७.१, बल्लाळवाडी ३७.०, हवेली ३७.०, दापोडी ३६.५, नारायणगाव ३६.३, माळीण ३५.५, भोर ३५.५, लोणावळा ३५.२, गिरीवन ३५.०, निमगिरी ३४.९, लवासा ३४.३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT