Temperature Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Heat : अकोल्यात तापमानाची चाळिशी पार, पावसानंतर आता उन्हाचे चटके

Akola Temperature : गेल्या आठवड्यात उन्हाळ्यात पाऊस झाल्याने काही काळ गारवा तयार झाला. मात्र, वातावरण आता निवळल्याने तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली आहे.

Team Agrowon

Akola News : गेल्या आठवड्यात उन्हाळ्यात पाऊस झाल्याने काही काळ गारवा तयार झाला. मात्र, वातावरण आता निवळल्याने तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली आहे.

शुक्रवारी (ता.१४) अकोल्यात सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या उन्हाळ्यातील हे आतापर्यंत सर्वाधिक तापमान (temperature) आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, आता काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मे महिन्यापर्यंत ईशान्य आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात आणि वायव्य भारताच्या काही भागात कमाल तापमान सामान्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

मात्र तीन दिवसांपासून वातावरण बदलत असून सकाळी ९ वाजेपासून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. शुक्रवारी ४१.५ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले. पश्चिम आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे एकत्र आल्यामुळे चक्राकार स्थिती निर्माण झाली.

एप्रिल महिन्यातील तापमान नोंदी

एक एप्रिल ३६.९, दोन एप्रिल ३८.२, तीन एप्रिल ३९.०, चार एप्रिल ३९.६, पाच एप्रिल ४०.४, सहा एप्रिल ४०.००, सात एप्रिल ३७.३, आठ एप्रिल ३१. ६, नऊ एप्रिल ३७.९, १० एप्रिल ३६.७, ११ एप्रिल ३९.९, १२ एप्रिल ४१.१, १३ एप्रिल ४०.३, १४ एप्रिल ४१.५ अंश सेल्सिअस.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT