Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : ‘तळहिरा’तील पाणी उपशामुळे तलाव कोरडा

Water Crisis : परिसरातील अनेक गावांची तहान भागविणाऱ्या तळहिरा पाझर तलावातील पाणी उपशामुळे सध्या हा तलाव अखेरची घटका मोजत आहे.

Team Agrowon

Satara News : परिसरातील अनेक गावांची तहान भागविणाऱ्या तळहिरा पाझर तलावातील पाणी उपशामुळे सध्या हा तलाव अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे या भागातील अनेक गावांसाठी दुष्काळाचे संकट अधिक गडद होत चालले आहे.

२०२२-२३ मध्ये या परिसरात १६०० मिलिमीटर अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. चालू वर्षी २०२३ -२४ मध्ये केवळ ५०० मिलिमीटर पाऊस पडल्याने परिसरात दुष्काळी परिस्थिती झाल्याने तलावात पाण्याची आवक झाली नाही.

शिल्लक पाणीसाठा तलाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी उपसा करत संपवला असल्याने आता हा तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. यामुळे या तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील अनेक गावांत पाणीटंचाई समस्या जाणवू लागली आहे.

देऊरसह परिसरातील शेकडो हेक्टर शेतीसाठी हा तलाव उपयुक्त आहे. तलाव भरल्यानंतर परिसरातील सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरी कूपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ होते. मात्र, तलाव कोरडा पडल्याने परिसरातील विहिरी कूपनलिका आता कोरड्या पडू लागल्या आहेत. याचा परिणाम या परिसरातील बागायत क्षेत्र कमी होणार आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या तलावात शिल्लक असलेला मृत पाणीसाठा ही येथील शेतकरी पाणी उपसा करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता जनावरांनाही पाणी मिळणे मुश्कील झाले आहे.

उत्तर दुष्काळी भागासाठी उपयुक्त तळहिरा पाझर तलाव दुष्काळी परिस्थितीत कायम भरण्यासाठी या तलावात जिहे-कठापूर योजनेतील पाणी सोडावे, या मागणीसाठी राजकीय गट-तट बाजूला ठेवून एकत्र यावे.
- राहुल कदम, माजी सदस्य, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT