Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Mazi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’च्या दाखल्यासाठी ३० रुपये मागणारा तलाठी निलंबित

Bribe News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी व कामकाजातील त्रुटींमुळे उमरी (ता. बाळापूर) येथील तलाठी राजेश शेळके यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

 गोपाल हागे

Akola News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी व कामकाजातील त्रुटींमुळे उमरी (ता. बाळापूर) येथील तलाठी राजेश शेळके यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी हा आदेश जारी केला.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी महिलांकडून मोठी उमरी येथील तलाठी पैसे घेत असल्याचा प्रकार समोर आला होता. यासंबंधी तलाठ्याला तत्काळ नोटीस बजावण्यात आली.

मात्र त्यांनी अद्याप खुलासा सादर केला नाही. त्यांच्या दफ्तराची तपासणी करण्यात आली, तसेच सज्जाच्या ठिकाणी ८ नागरिकांचा जबाबही घेण्यात आला. तलाठ्यांनी उत्पन्न दाखल्यासाठी ३० रुपयांची मागणी केली, असा जबाब नागरिकांनी दिला.

दफ्तर तपासणीत गाव नमुना एकच्या नोंदी, गाव नमुना पाचसोबत न जुळणे, नमुना एक अ एक ई पर्यंत अद्ययावत नसणे, गाव नमुना २ ई-चावडीत अद्ययावत नसणे, फेरफार प्रलंबित असणे, त्यात विसंगती आढळणे, ई-चावडीमधील नमुना ६ ड निरंक असणे, नमुना १५ मध्ये नोंदी नसणे,

दफ्तरात दैनंदिनी, कार्यालयात आदर्श तक्ता नसणे आदी अनेक त्रुटी आढळून आल्या. शासकीय कामात हलगर्जीपणा, सचोटी न राखणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार तलाठी राजेश शेळके यांना निलंबित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT