Anil Deshmukh Agrowon
ॲग्रो विशेष

Financial Assistance : संत्रा बागायतदारांच्या आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्या : देशमुख

Anil Deshmukh : संत्रापट्ट्यात फळगळतीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून या भागात मार्गदर्शन व आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.

Team Agrowon

Nagpur News : संत्रापट्ट्यात फळगळतीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून या भागात मार्गदर्शन व आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा माजी गृहमंत्री तसेच आमदार अनिल देशमुख यांनी व्यक्‍त केली.

काटोल तालुक्‍यातील फळगळतीचा आढावा घेताना शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी तालुका कृषी अधिकारी भवारी, नायब तहसीलदार भुजाडे, प्रादेशिक संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण दवणे उपस्थित होते. अनिल देशमुख यांनी फळगळती झालेल्या अनेक बागांची पाहणी केली.

शासनाने संत्रा बागायतदारांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपुरात असताना त्यांच्याद्वारेदेखील कोणत्याच प्रकारच्या उपाययोजनांची शिफारस आजवर करण्यात आली नाही. संस्थेचा एकही तज्ज्ञ या भागात फिरकला नाही.

त्यामुळे ‘सीसीआरआय’ची कोणतीच उपयोगिता सामान्य शेतकऱ्यांसाठी नसल्याची खंतदेखील यावेळी व्यक्‍त करण्यात आली. याउलट कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या वंडली फार्मचे तज्ज्ञ सातत्याने मार्गदर्शनासाठी उपलब्ध होतात, असेही शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. या वेळी तालुका कृषी अधिकारी भवारी यांनी बाधित क्षेत्राबाबत माहिती दिली.

डॉ. प्रवीण दवणे यांनी पाण्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत फळगळती होत असल्याचे सांगितले. नागपूर व अमरावती भागातील अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिल्याने काही ठिकाणी फळगळती नियंत्रणात असल्याचेही डॉ. दवणे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT