Grape Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming : द्राक्षाब‌द्दल गैरसमज, अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा

Grape Growers Union : पोलिस अधीक्षकांकडे द्राक्ष बागायतदार संघाची मागणी

Team Agrowon

Nashik News : गेल्या दहा वर्षांपासून द्राक्ष पिकावर मोठी संकटे येत आहेत. चालु द्राक्ष हंगामात गारपीट अन अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे नुकसान झाले;परंतु त्यातूनही शेडनेट क्रॉप कव्हर यासारख्या साधनांचा वापर करून शेतकऱ्यांनी द्राक्षमाल वाचविला.

अशा स्थितीत समाजमाध्यमांवर द्राक्षाब‌द्दल गैरसमज व अफवा पसरविल्या जात आहेत. अशा अकांऊट चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्याकडे केली.

सध्या मागणीच्या तुलनेत द्राक्षाची उपलब्धता कमी आहे. तसेच प्रदेशातही निर्यात सुरू आहे. गुजरात, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, काठमांडू या राज्यात नाशिक विभागातील द्राक्षमालास मोठी मागणी आहे. त्या बाजारपेठेत खप वाढला आहे.

अशात द्राक्ष पिकाबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. पर्यायाने शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान होण्यासाठी जाणीवपूर्वक समाज माध्यमातून गैरसमज पसरले जात आहेत, असा आरोप संघाने केला आहे. द्राक्ष फळ आरोग्यास अपायकारक आहे, त्याचे सेवन करू नये.

द्राक्ष फळात विविध रासायनिक घटकांचे अंश असतात, अशा अफवा पसरविण्यात येत आहेत. वास्तविक द्राक्षमालाचे उत्पादन हे ‘अपेडा’ने ठरवून दिलेल्या रेसिड्यू विरहित नियमावलीनुसार घेतले जाते. त्यात मानवी शरीरास अपायकारक असा कोणताही घटक नसल्याचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामार्फत कळविले जाते.

त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, मानद सचिव बाळासाहेब गडाख, सुरेश कळमकर, रावसाहेब रायते, रामनाथ शिंदे, द्राक्ष उत्पादक बाळासाहेब वाघ, शिवा ढोमसे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT