Soybean Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton, Soybean Seed : ‘कपाशी, सोयाबीन बियाण्यांची जादा दराने विक्रीप्रकरणी विक्रेत्यांवर कारवाई करा’

Private Seed Producing Company : खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांच्या कपाशी, तसेच सोयाबीनच्या विशिष्ट वाणांच्या बियाण्यांची नरचर ॲपद्वारे जादा दराने विक्री होत असल्याचे आढळून येत आहे.

Team Agrowon

Parbhani Seed News : खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांच्या कपाशी, तसेच सोयाबीनच्या विशिष्ट वाणांच्या बियाण्यांची नरचर ॲपद्वारे जादा दराने विक्री होत असल्याचे आढळून येत आहे. या प्रकरणी संबंधित विक्रेत्यांवर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी बचाव कृषी समितीतर्फे कृषी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यात विभागाची कोणतीही परवानगी नसताना नरचर ॲपच्या माध्यमातून तुळसी कंपनीच्या कंबड्डी, पंगा, रेनबो तसेच यूएस ॲग्रीसीड कंपनीच्या यूएस ७०६७ या वाणांच्या बियाणे पाकिटांची कृत्रिम टंचाई निर्माण करून किरकोळ विक्रेत्यांना १ हजार ५ रुपये दराने विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

परिणामी शेतकऱ्यांना या वाणांच्या बियाण्यांची जादा दराने खरेदी करावी लागू शकते. या वाणासोबत इतर वाणाचे बियाणे खरेदीची सक्ती व्यापाऱ्याकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नरचर ॲपला तुटवडा असलेले वाण विक्रीस उपलब्ध करून देणाऱ्या ठोक विक्रेत्यांवर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. बुकिंगवर बंदी असताना ज्या कंपन्यांनी ठोक विक्रेते यांच्याकडून रक्कम घेवुन कृत्रिम टंचाई निर्माण केलेली आहे, अशा कंपन्या व व्यापारी यांचे खाते उतारा तपासण्यात यावा.

राज्यातील शेतकऱ्यांची अशा पद्धतीने कोंडी करून साठेबाजी व जादा दराने विक्री करून नफा मिळवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. शेतकऱ्याना योग्य किंमतीत बियाणे उपलब्ध होण्यासाठी विभागाच्या नियंत्रणाखाली बियाणे वाटप करण्यात यावेत.

नरचर ॲप सारख्या कृषी विभागाची मान्यता नसलेल्या ॲपला माल उपलब्ध करून देण्याऱ्या व्यापाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. सामान्य शेतकऱ्यांना योग्य किंमतीत बियाणे उपलब्ध करून द्यावे. अन्यथा व्यापारी व कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी बचावचे संघटक सुनील बावळे पाटील यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mechanization Subsidy: राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ७०० कोटी रुपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता

Land Measurement: जमिनीच्या पोटहिश्श्याची मोजणी २०० रुपयांत, दोनच सुनावण्यांमध्ये वाद निकाली निघणार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Black Money Allegation: मंत्रालयाचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी खरातचा वापर

LPG Gas Cylinder Delivery: ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे: जिल्हाधिकारी स्वामी

Water Conservation: पाणी अडवा-जिरवा प्रकल्पांना गती द्या: पापळकर

SCROLL FOR NEXT