Takari Irrigation  Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation : ‘ताकारी’ पाण्याने विहिरी तुडुंब ; मुख्य कालव्याच्या १४४ किलोमीटरपर्यंत लाभ

Takari Project : दुष्काळाशी झगडत जगणाऱ्या तीन तालुक्यासह वाळवा आणि पलूस तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून ताकारी योजनेतून पाणी येऊ लागले. त्यामुळे शाश्वत पाण्याची सोय झाली आहे.

Team Agrowon

Sangali News : सांगली ः दुष्काळाशी झगडत जगणाऱ्या तीन तालुक्यासह वाळवा आणि पलूस तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून ताकारी योजनेतून पाणी येऊ लागले. त्यामुळे शाश्वत पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे शेती बागायती झाली आहे. दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केल्यानंतर आवर्तन सुरू केल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. योजनेच्या पाण्याने विहिर, तलाव, बंधारे तुडुंब भरल्याने बळीराजा सुखावला आहे.

तिसरा, चौथा टप्पा असे लाभक्षेत्र वाढले. सध्या मुख्य कालव्याची लांबी १४४ किलोमीटर आहे. हे पाणी मिरज तालुक्यातील सोनी, भोसेपर्यंत जाते. जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव, मिरज तालुक्यातील कमी-अधिक गावांच्या शेतीला पाण्याचा लाभ निश्चित होतो. कृष्णा-कोयना सिंचन लवदाने ताकारी योजनेच्या पावसाळ्यासाठी १.८५, रब्बीसाठी ४.३७ तर उन्हाळी आवर्तनासाठी ३.१२ असा एकूण ९.३४ टीएमसी पाणीसाठा २७ हजार ४४३ हेक्टरसाठी राखीव आहे.

त्यानुसार आवर्तनाचे नियोजन करून प्रत्येक आवर्तनाचे पाणी उचलून दिले जाते. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु झाले होते. पहिले आवर्तन सुमारे ५५ दिवस सुरु राहिले होते. पहिल्या आवर्तनासाठी दीड एटीएमसी पाणी उचलले होते. यंदाच्या हंगामातील ताकारी उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु झाले आहे.ताकारी योजनेतून पाणी सोडण्याचे नियोजन कोयना धरणावर असते.

त्यामुळे त्यानुसार आवर्तन ठरवले जाते. दरवर्षी नोव्हेंबर महिना सुरु झाले की पाणी मागणी सुरु होते. यंदा डिसेंबर महिन्यापासून काही अंशी पाण्याची टंचाई निर्माण होवू लागली. त्यामुळे पाटबंधारे विभागाने योजना सुरु करण्याचे नियोजन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरु केले. पाणी वितरणापासून, सिंचनक्षेत्र मोजणी, पाणीपट्टी आकारणी ते वसुली अशी सर्व कामे अल्प मनुष्यबळावर करताना ‘पाटबंधारे’ची चांगलीच दमछाक होताना दिसते आहे.

कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन, प्रचंड पाणीवापर यामुळे ताकारीचे पाणी गतीने पुढे सरकत नाही. यासाठी ११ पंप सुरू केले आहेत. यापैकी टप्पा ३ वर ३ आणि टप्पा ४ वरील २ पंप सुरू करून सोनहिरा खोऱ्यासह तडसर परिसरात पाणी सोडले आहे. उर्वरित ६ पंपांचे पाणी मुख्य कालव्यातून वाहत आहे. पाणी शेवटच्या १४४ कि.मी.वर पोहोचविल्याशिवाय बंद होणार नाही.

- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ind-Us Trade Deal : अमेरिकेचा नवसाम्राज्यवाद आणि दादागिरी

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT