Tribal Craft  Agrowon
ॲग्रो विशेष

Ranmeva Mithai : रानमेव्याच्या मिठाईची परदेशवारी

Tribal Food : पालघर तथा अन्य आदिवासी जिल्ह्यातील आदिवासींनी बनविलेली मिठाई परदेश वारीला निघाली आहे.

Team Agrowon

Javhar News : आदिवासी बांधव जंगलात वास्तव्य करत ऋतूमानानुसार उपलब्ध होत असलेल्या रानमेव्यातून आपली गुजराण करतो. यातील पोषक भाग तथा औषधी, सुगंधी वनस्पतींचा समावेश आपल्या आहारात करून सुदृढ आरोग्य जीवनपद्धतीचा अवलंब करतात.

आदिवासी बांधवांची जीवनपद्धती आणि जंगलातील विविध पदार्थांपासून तयार झालेले विविध मेनू शहरातील नागरिकांच्या आहारात असावेत, याबाबत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडून उपक्रम राबवण्यात येत आहे.

पालघर तथा अन्य आदिवासी जिल्ह्यातील आदिवासींनी बनविलेली मिठाई परदेश वारीला निघाली आहे. आदिवासी संस्कृतीला जागतिक व्यासपीठावर नवी ओळख करून देण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने पावले उचलली आहेत.

आदिवासी बांधवांनी हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेल्या उत्कृष्ट उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळाले, तर आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावतानाच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘शबरी नॅचरल्स’च्या माध्यमातून विविध प्रयास केले जात आहेत.

शबरी नॅचरल्स ब्रॅण्डच्या माध्यमातून पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध आहेत. या ब्रॅण्डचे फक्त देशातच नव्हे, तर परदेशातही मार्केटिंग करून त्याला जागतिक दर्जा प्राप्त करून दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही ४० लाखांचे उद्दिष्ट ठेवले असून, लवकरच हा व्यवसाय कोट्यवधींचा टप्पा गाठेल.
- लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT