Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Swami Samarth Sugar Mill : स्वामी समर्थ साखर कारखान्यावर शेतकरी विकास पॅनेलचे वर्चस्व

क्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनेलने २१ पैकी १९ जागा मिळवत कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.

Team Agrowon

Solapur News : अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या (Swami Samarth Cooperative Sugar Factory) संचालक मंडळ निवडणुकीत माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (MLA Sidramappa Patil) आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी (MLA Sachin Kalyanshetty) यांच्या स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनेलने २१ पैकी १९ जागा मिळवत कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांच्या नेतृत्वाखालील स्वामी समर्थ बचाव पॅनेलला मात्र पराभव पत्कारावा लागला आहे.

कारखान्याच्या २१ जागांपैकी १३ जागा या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यात पाटील आणि कल्याणशेट्टी गटाने वर्चस्व मिळवले होते. दोन जागी उमेदवार न मिळाल्याने त्या रिक्त राहिल्या. तर उर्वरित सहा जागांसाठी ही निवडणूक झाली.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी नुकतेच मतदान झाले. या सहाही जागेवर पाटील आणि कल्याणशेट्टी यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला.

निवडीनंतर सर्व नूतन संचालकांचा सत्कार आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी काम पाहिले.

गेल्या २५ वर्षांपासून कारखान्यावर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे वर्चस्व आहे. यंदा त्यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही साथ दिली.

कारखान्याचे विजयी उमेदवार

निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, बसलिंगप्पा खेडगी, विश्वनाथ भरमशेट्टटी, अप्पासाहेब पाटील, दिलीप पाटील, भीमाशंकर धोत्री, उत्तम वाघमोडे, महेश पाटील, दिलीप शावरी, देवेंद्र बिराजदार, अभिजित सवळी, संजीव पाटील, श्रीमंत कुंटोजी, संजीवकुमार पाटील, शिवप्पा बसरगी, मल्लिकार्जुन बिराजदार, ब्रम्हनाथ घोडके, गिरिजा विजापुरे, महानंदा निंबाळे यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Scam: कांदा खरेदीतील आर्थिक गैरव्यवहारामुळे ‘नाफेड गो बॅक’

Pune ZP: जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Ranbhaji Takla Modak: रानभाजी ‘टाकळा’पासून मोदक निर्मिती

Crop Insurance: नवीन पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प

Ajit Pawar: चांगल्या अधिकाऱ्यांची प्रशासनात गरज: अजित पवार

SCROLL FOR NEXT