Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bill : थकित ऊसबिलांसाठी ‘स्वाभिमानी’चे धरणे

Sugarcane FRP : जिल्ह्यात गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची बिले मोठ्या प्रमाणात थकविली आहेत.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची बिले मोठ्या प्रमाणात थकविली आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापुरात साखर सहसंचालक कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. ९) धरणे आंदोलन करण्यात आले.

‘स्वाभिमानी’चे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. साखर सहसंचालक प्रकाश आष्टेकर व उपसहसंचालक पांडुरंग साठे यांनी संबंधित साखर कारखान्याशी संपर्क करून या आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांची ऊसबिले तत्काळ जमा करण्यास सांगितले.

आंदोलनात स्वाभिमानचे इक्बाल मुजावर, पप्पू पाटील, शहाजी सोमवंशी, मोहसिन बिराजदार, बिळ्यांनी सुंटे, दत्तात्रय पांढरे, नितीन मस्के, श्रीपती ढुणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कायद्यानुसार उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांत ऊसबिले देणे बंधनकारक असतानाही जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी मागील सहा महिन्यांपासून ऊस बिले जमा केलेली नाहीत.

या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसदराची स्पर्धा करून कारखाने दहा दिवसांत बिले जमा करतील, असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात बिले थकविली आहेत.

काही साखर कारखाने एफआरपीपेक्षा जास्त पैसे दिले असे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ऊसबिले अदा केलेली नाहीत. तरी शेतकऱ्यांची थकित ऊसबिले लवकर जमा करण्यास साखर कारखानदारांना भाग पाडावे, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

साखर सहसंचालक प्रकाश आष्टेकर यांच्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. परंतु १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण थकीत ऊसबिले न मिळाल्यास संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
- विजय रणदिवे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT