Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Protest: पीकविमा भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Swabhimani Shetkari Sanghtana: वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२४ च्या खरीप हंगामासाठी पीकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

Team Agrowon

Washim News: वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२४ च्या खरीप हंगामासाठी पीकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता.२४) हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी बोलताना श्री. इंगोले यांनी ५ मे पर्यंत पीकविम्याचा मोबदला न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याची घोषणा करीत कंपनी आणि सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही जाहीर केले. खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी होऊन सोयाबीन, तूर, कपाशी इत्यादी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.

मात्र या नुकसानीपोटी पीकविमा कंपनीकडून अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला देण्यात आलेला नाही. तसेच सरकारकडून जाहीर झालेली अतिवृष्टीची मदतही अद्याप देण्यात आली नाही. यासाठी वारंवार मागणी होऊनही शेतकऱ्यांना पैसे देण्यात येत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकारात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या. वाशीम जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप २०२४ चा पीकविमा सरसकट तात्काळ देण्यात यावा, शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची मदत तात्काळ देण्यात यावी,सन २०२३ च्या रब्बी हंगामाचा पीकविमा मोजक्याच शेतकऱ्यांना देण्यात आला असून तो सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवगा भाव नरमले; सोयाबीन स्थिरावले, कापसात चढ उतार, केळीचे दर टिकून तर गवार तेजीतच

PM Kisan Yojana: अर्थसंकल्पात 'पीएम किसान'साठी किती तरतूद?; २२ वा हप्ता 'या' तारखेला मिळू शकतो

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांसाठी दिलासा! शासन फेरपडताळणी सुरू करणार

Ambeohol Dam Project Issue: आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे

Union Budget 2026: काजू, नारळावर भर; शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण नाही

SCROLL FOR NEXT