Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : स्वाभिमानी संघटनेने रोखली ऊस वाहतूक

Sugarcane Transport : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षाचे ४०० रुपये आणि चालू एफआरपी साडेतीन हजार जाहीर न करताच साखर कारखाने सुरू केले आहेत.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षाचे ४०० रुपये आणि चालू एफआरपी साडेतीन हजार जाहीर न करताच साखर कारखाने सुरू केले आहेत. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

शनिवारी (ता. ११) कऱ्हाड तालुक्यातील वाठार आणि पाचवड फाटा येथे कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

दरम्यान, तातडीने घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थी करून चार दिवसांत एफआरपी जाहीर करण्याचे आश्वासन दिल्याने अडवलेले उसाचे ट्रॅक्टर साखर कारखान्यांकडे मार्गस्थ करण्यात आले.

‘स्वाभिमानी’चे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील वर्षीच्या उसाला ४०० रुपये व चालू वर्षाच्या उसाला साडेतीन हजार रुपये उचल जाहीर करावी आणि मगच साखर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत केले होते. सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे.

मात्र अद्यापही जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने ऊसदर जाहीर केलेला नाही मागील वर्षीचे ४०० रुपये देण्याची घोषणा केलेली नाही.

त्यामुळे आक्रमक झालेल्या ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, देवानंद पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे, पक्ष उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, रमेश पिसाळ व शेतकऱ्यांनी वाठार आणि पाचवड फाटा येथे ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर अडवून आंदोलन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT