Shaktipeeth Highway  Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : ‘स्वाभिमानी’कडून अर्थसंकल्प, ‘शक्तिपीठ’च्या अधिसूचनेची होळी

Shaktipeeth Highway Notification : राज्य अर्थसंकल्प व शक्तिपीठ महामार्ग अधिसूचनेच्या प्रती या होळीत जाळून गुरुवारी (ता. १३) परभणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. 

Team Agrowon

Parbhani News : राज्य अर्थसंकल्प व शक्तिपीठ महामार्ग अधिसूचनेच्या प्रती या होळीत जाळून गुरुवारी (ता. १३) परभणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. 

विधानसभा निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ६००० रुपये, तर कापसाला प्रतिक्विंटल ९००० रुपये भाव देऊ, संपूर्ण कर्जमाफी करू, शक्तिपीठ महामार्ग रद्द करणार यासारखे शेतकरी हिताचे आश्वासने दिले शेतकऱ्यांनी भर भरून मते दिली.

सरकार बहुमतांनी निवडून आले. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी मारक धोरण राबविण्यास सुरुवात केली. सोयाबीनला सहा हजार भाव तर सोडाच साधा हमीभाव सुद्धा मिळत नाही‌ संपूर्ण सोयाबीन नाफेडच्या मार्फत खरेदी करणार म्हणाले. खरेदी बंद केल्यामुळे सोयाबीनचे भाव ३५०० रुपयांपर्यंत कोसळले आहेत.

कापूस, तूर, हरभरा यांचे देखील दर कमी झाले आहेत. शेती पिकांचा उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. मराठवाडा व विदर्भात सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. कर्ज मुक्त करतो म्हणून दिलेला शब्द पाळायला तयार नाही. अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद देखील करण्यात आली नाही.‌

सरकारच्या चुकीच्या धोरणांचा होळीमध्ये दहन करत आहोत. शेतकरी विरोधी धोरण अवलंबू नये. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तत्काळ करावी. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या शेती विरोधी धोरणाची होळी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, गजानन तुरे, सय्यद कलिम, पी. टी. निर्वळ, जगन्नाथ जाधव, किशन शिंदे, कारभारी जोगदंड, विकास भोपळे, गजानन दुगाणे, सतीश दुगाणे, विठ्ठल चोखट, नामदेव काळे, दत्ता परांडे, रणजित चव्हाण आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT