Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ‘उसाच्या एफआरपीचे थकित १३५ कोटी ५ दिवसांत जमा करावेत’

FRP Dues : ज्या सरकारकडून बेकायदेशीर कायदा करून साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन किंवा तीन टप्प्यांत एफआरपी अदा करत होते.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपीचे थकित १३५ कोटी रुपये व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ दिवसांत जमा करावे त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेले बोगस व लिंकिंग खतांची विक्री करणाऱ्या कंपन्यावर कडक कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन करण्यात आली.

ज्या सरकारकडून बेकायदेशीर कायदा करून साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन किंवा तीन टप्प्यांत एफआरपी अदा करत होते. यामुळे ऊस तुटल्यापासून एक-एक वर्षापर्यंत शेतक-यांना त्यांची रिकव्हरीनुसार मिळणारी हक्काची एफ. आर. पी. मिळत नव्हती.याचाच गैरफायदा घेऊन कोल्हापूर विभागातील कारखानदार जवळपास १३५ कोटी रुपयांची एफआरपी थकित ठेवली आहे.

याबरोबरच जिल्ह्यांमध्ये युरीया व इतर खतांची टंचाई भासवून लिंकिंग केले जात आहे. जिल्ह्यातील खत विक्री करणा-या किरकोळ विक्रेते दुकानदार यांचेवर कारवाई करण्याचा फार्स विभागाकडून केला जातो. बोगस खत विक्री व लिंकिंगमध्ये कृषी विभागातील अधिकारी व संबधित कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने संबधित खत कंपनीवर कारवाई करण्याऐवजी स्थानिक दुकानदार यांचेवर कारवाई करून पिळवणूक केली जात आहे. यापुढे संबधित दुकानात बोगस खते व लिंकिंगची खते विक्री सापडल्यास संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ‘स्वाभिमानी’ने केली.

आबिटकर यांनी, आठवड्याभरात जिल्ह्यातील कारखान्यांनी थकित एफआरपी न दिल्यास आरआरसीची कारवाई करण्यास भाग पाडू. तसेच बोगस व लिंकिंग खत कंपन्यांविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना सूचना देऊन फिरत्या पथकाच्या धाडी टाकण्याचे आदेश दिले.

त्याबरोबरच ज्या कंपन्या लिंकींगची सक्ती करतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, बाळासाहेब पाटील, राजाराम देसाई, सचिन शिंदे, संपत पवार, बंडू पाटील, सुधीर मगदूम, तानाजी वठारे, विशाल चौगुले, अण्णा मगदूम, अप्पा एडके, विक्रम पाटील, विजय कर्वे, विवेक चौगुले यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT