Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Price Issue : ‘स्वाभिमानी,’ ‘आंदोलन अंकुश’ ऊसदरप्रश्‍नी एकत्र लढणार

Swabhimani Shetkari Sanghtana and Andolan Ankush : स्वाभिमानी शेतकरी संघटना व ‘आंदोलन अंकुश’ यांनी मागणी केल्याप्रमाणे ऊसदरावर तोडगा काढण्याकरिता साखर कारखान्यांनी लवकरात लवकर पुढाकार घ्यावा.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटना व ‘आंदोलन अंकुश’ यांनी मागणी केल्याप्रमाणे ऊसदरावर तोडगा काढण्याकरिता साखर कारखान्यांनी लवकरात लवकर पुढाकार घ्यावा.

दराचा तोडगा न काढता, दमदाटी करून गळीत हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास दोन्ही संघटना ताकदीने विरोध करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना व ‘आंदोलन अंकुश’च्या प्रमुखांनी दिला आहे. दरम्यान, ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसतोडी स्वीकारू नयेत, असे आवाहनही या संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तक्तमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, राजगोंडा पाटील, राम शिंदे तसेच ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

चालू गळीत हंगामास येणाऱ्या उसाला ३७०० रुपये व मागील हंगामात तुटलेल्या उसाला प्रतिटन दोनशे रुपये द्यावेत, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या मागणीचा विचार न करता काही साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तथापि, हा प्रयत्न दोन्ही संघटना एकत्रित परतावून लावतील. साखर कारखाने लवकरात लवकर सुरू करावयाचे असतील, तर साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी संघटनेच्या प्रमुखांशी तातडीने चर्चा करावी व गळीत हंगाम सुरळीत सुरू करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

तोडगा निघाल्यानंतर पहिल्या पन्नास दिवसांमध्ये कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडावा. तसेच पूरबाधित ऊस प्राधान्याने तोडावा. याशिवाय ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार, ऊस तोडणी करता अडवणूक करून एकरी पाच ते दहा हजार रुपये मागत आहेत.

त्यांच्यावर साखर कारखान्यांनी कारवाई करावी. तसेच ऊस कामगार तोडणी कामगार ऊस तोडणी कामगार अडवणूक करीत असतील तर संघटनेच्या प्रतिनिधींशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

दरम्यान, शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील काही साखर कारखाने सुरू झाले असले, तरी पूर्ण क्षमतेने साखर कारखाने सुरू नाहीत. दोन्ही संघटना ऊस दराकरिता एकत्रित लढा देणार असल्याने साखर कारखान्यांनी ऊस दराचा तोडगा काढण्याकरिता लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशी मागणी ऊस उत्पादकांमधून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Damage : देशातील २.४९ लाख हेक्टरवरील पिकांना अवकाळी आणि गारपीटीचा फटका; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी दिली मदतीची ग्वाही

Farmers Protest Warn: पंधरा दिवसांत मागण्या मान्य करा, अन्यथा राज्यभर आंदोलन पेटणार

Irrigation Care After Use: हंगामानंतर सिंचन संच बंद करण्यापूर्वीच्या ३ महत्त्वाच्या स्टेप्स

Sugarcane FRP Dues: पाच हजार कोटींची ‘एफआरपी’ न दिल्यास अवमान याचिका: राजू शेट्टी

Solar Pump Scheme: सौर कृषी पंपाचे नुकसान झाल्यास किती वर्षे मोफत दुरुस्ती, नियम काय सांगतो?

SCROLL FOR NEXT