Survey by drone Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : पीकविमा कंपनीकडून ड्रोनद्वारे पिकांचा सर्व्हे सुरू

Crop Insurance Scheme : या सर्व्हेसाठी मोहोळ तालुक्यातील वाळूजची या एकाच गावाची निवड केली असून शुक्रवारी सर्व्हे पूर्ण झाला आहे.

Team Agrowon

Solapur News : पीक विमा कंपनीकडून जिल्ह्यात ड्रोनद्वारे सर्व्हे सुरू झाला असून शुक्रवारी वाळूज (ता. मोहोळ) येथून प्रारंभ झाला. पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील पाच गावांची यासाठी निवड केली असून स्थानिक प्रशासन व शेतकरी मात्र याबाबत अनभिज्ञ आहेत.

जिल्ह्यात पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक दिवस खंड पडला असल्याने यापूर्वीच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार विमा कंपनी, शेतकरी व कृषी सहायक यांनी संयुक्त पीक पाहणी केली आहे. तरीही पीकविमा कंपनीने निवडक गावांचा ड्रोन सर्व्हे सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सर्व्हेतून कंपनी कोणता अहवाल पाठविणार व  २५ टक्के नुकसान भरपाई मिळण्याबाबत त्याचा काय परिणाम होणार यावरून शेतकऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू झाली आहे. वीमा कंपनी वाळूज (ता. मोहोळ) येथील संपूर्ण शिवाराचा ड्रोन सर्व्हे केला असून यासाठी स्वतंत्र पथक आहे. कंपनीचे काही कर्मचारी गावाच्या सर्व शिवारातून ड्रोनद्वारे व्हिडीओ चित्रिकरण करत आहेत.

या सर्व्हेसाठी मोहोळ तालुक्यातील वाळूजची या एकाच गावाची निवड केली असून शुक्रवारी सर्व्हे पूर्ण झाला आहे. बार्शी तालुक्यातील मळेगाव, पांगरी व मालेगाव व अक्कलकोट तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT