Mango Pest  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Pest : फुलकिडीने नुकसान झालेल्या आंबा बागांचे सर्व्हेक्षण करा

Mango Pest Management : फुलकिडीमुळे आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण कृषी विभागाने तातडीने करावे, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : फुलकिडीमुळे आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण कृषी विभागाने तातडीने करावे, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. दरम्यान, फुलकिडीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवगड येथील संशोधन उपकेंद्रांत किटकशास्त्रज्ञ नेमण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत.

तौक्ते वादळानंतर सिंधुदुर्गातील आंबा बागांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. फळमाशी नियत्रंणासाठी बागायतदार गेली दोन वर्षे झगडत होते. यावर्षी हा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असतानाच फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कित्येक वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आंब्यावर फुलकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे.

कोणत्याही कीटकनाशकांचा त्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान होत आहे. यासंदर्भात देवगड येथील आंबा बागायतदारांनी तहसीलदार आर. जे. पवार आणि तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांची भेट घेतली. फुलकिडीने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करा आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाकडे पाठवा, अशी मागणी बागायतदारांनी केली.

दरम्यान आंबा नुकसानीची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. फुलकीड नियत्रंणात आणण्यासाठी विविध प्रयोग करणे आवश्यक आहेत. त्यामुळे प्रशासनाने देवगड रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेद्रांत किटकशास्त्रज्ञाची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत ही नेमणूक होण्याची शक्यता आहे.

फुलकिडीचे व्हिडिओ व्हायरल

जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील सर्वच तालुक्यांमध्ये फुलकिडीने थैमान घातले आहे. आंब्यावर घोंघावत असलेल्या फुलकिडीचे व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT