Sugarcane Harvesting Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : माळीनगर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करा

Sugarcane Crushing : माळीनगर कारखान्याचा गेल्यावर्षीचा हंगाम सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडला.

Team Agrowon

Malinagar News : माळीनगर कारखान्याचा गेल्यावर्षीचा हंगाम सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडला. यंदाच्या हंगामातही शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश गिरमे यांनी केले.

कारखान्याच्या ९१ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन सेवानिवृत्त कामगार दीपक थोरात व धनंजय फडणीस यांच्या हस्ते विधिवत होमहवन करून झाले. कारखान्याच्या संस्थापकांच्या स्मृतींना स्मरण करत कारखान्याच्या आवारातील त्यांच्या पुतळ्यांना सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांचा भेटवस्तू देऊन याप्रसंगी सन्मान करण्यात आला. व्यवस्थापकीय संचालक गिरमे म्हणाले, की सभासदांच्या विश्वासाचे बळच, कारखान्याच्या प्रगतीतला महत्त्वाचा वाटा आहे, हा विश्वास असाच दृढ ठेवा, असेही ते म्हणाले.

यावेळी पूर्णवेळ संचालक परेश राऊत, उपाध्यक्ष निखिल कुदळे, संचालक मोहन लांडे, राहुल गिरमे, यश बोरावके, विशाल जाधव, निळकंठ भोंगळे, इंडिपेंडट डायरेक्टर राजीव देवकर, माजी संचालक हेमंत रासकर, समीर पांढरे,‘शुगरकेन’चे अध्यक्ष अमोल ताम्हाणे, संचालक कुणाल इनामके,

दि. सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजय गिरमे, संचालक रत्नदीप बोरावके, डॉ. अविनाश जाधव, कल्पेश पांढरे, पृथ्वीराज भोंगळे आदी उपस्थित होते. विवेक देशमाने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

दिवाळीसाठी माळीनगर कारखान्याच्या कामगारांना १५ टक्के बोनस देण्यात येणार आहे.
- राजेंद्र गिरमे, अध्यक्ष, माळीनगर साखर कारखाना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Maharashtra : राज्यात ५ लाख एकर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

Kiwi Fruit Benefits: रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे किवी

Sugarcane Worker Registration: बीड जिल्ह्यात ५८४५ ऊसतोड कामगारांची नोंदणी पूर्ण

Rain Mango Damage: पूर्वमोसमीचा तडाखा; आंब्यासह भाज्या मातीमोल

SCROLL FOR NEXT