Ethanol Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Supply : तेल कंपन्यांना इथेनॉलचा १६९ कोटी लिटरचा पुरवठा

Ethanol Production : देशाने फेब्रुवारीअखेर पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण ११.६० टक्क्यांपर्यंत नेले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशाने फेब्रुवारीअखेर पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण ११.६० टक्क्यांपर्यंत नेले आहे. साखर-आधारित आणि धान्य-आधारित प्रकल्‍पांमधून नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या चार महिन्यांत २९८ कोटी लिटर इथेनॉलचा करार करण्यात आला. या पैकी प्रत्यक्षात १६९ कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना देण्यात आले आहे.

केंद्राने गेल्या काही वर्षांपासून इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवून इंधनावरील परकीय चलन वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यंदा मात्र साखरेचे उत्पादन कमी होत असल्‍याने केंद्राने साखरेपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर प्रतिबंध घातला आहे.

या पार्श्‍वभूमीवर साखर-आधारित प्रकल्पांनी १३६ कोटी लिटर इथेनॉलपैकी १०१ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा तेल कंपन्यांना केला आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत उसाच्या रसापासून तयार झालेल्या इथेनॉलचा करार ४५ कोटी लिटर होता. करारापेक्षा जास्त म्हणजे ४६ कोटी लिटरचा पुरवठा करण्‍यात आला आहे. सी हेवी मोलॅसिसचा करार १७ कोटी लिटरचा होता, फेब्रुवारी अखेरपर्यंत ३.६ कोटी लिटरचा पुरवठा करण्यात आला आहे.

केंद्राने साखर उद्योगावरील इथेनॉलचे अवलंबित्व कमी करुन धान्‍य आधारित इथेनॉलवर आधारित प्रकल्‍पांकडे लक्ष दिले आहे. धान्‍य आधारित प्रकल्पांनी तेल कंपन्‍यांशी केलेला करार १६२ कोटी लिटर आहे. या पैकी ६८ कोटी लिटरचा पुरवठा करण्यात आला आहे. खराब झालेल्या अन्न धान्यापासून तयार झालेल्या इथेनॉलचा करार ८७ कोटी लिटर इतका आहे.

यापैकी ३७ कोटी लिटरचा पुरवठा झाला आहे. मका आधारित इथेनॉलचा करार ६० कोटी लिटर इतका आहे. या पैकी प्रत्‍यक्ष पुरवठा ३१ कोटी लिटर इतका आहे. चांगल्या अन्नधान्यापासून (एसएफजी) तयार झालेल्‍या इथेनॉलचा करार १४ कोटी लिटरचा आहे. पण पहिल्‍या चार महिन्‍यांत याचा पुरवठा झाला नाही.

साखरेपासून इथेनॉलला आणखी परवानगी द्या

केंद्राने ऊस रस व साखरेपासून इथेनॉल तयार करण्यावर घातलेले निर्बंध तत्‍काळ दूर करावेत, अशी मागणी साखर उद्योगाची आहे. यंदा साखर उत्पादन कमी असले तरी जेवढी घट अपेक्षित होती तितकी होत नसल्‍याचे चित्र आहे.

ही शक्यता पाहता केंद्राने ऊस रस व साखरेपासून आणखी इथेनॉल तयार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योग सातत्याने करत आहे. ही परवानगी मिळाल्यास इथेनॉल तयार करण्यास वेग येईल, गतीने पुरवठा झाल्यास इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्टही लवकर साध्य होईल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT