Sunflower sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Sowing : खानदेशात सूर्यफूल पेरणी वाढणार

Khandesh Rabi Sowing : खानदेशात यंदा सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी वाढेल, असे संकेत आहेत. सूर्यफूल बियाण्याचा तुटवडा यंदा नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी वाढेल, असे संकेत आहेत. सूर्यफूल बियाण्याचा तुटवडा यंदा नाही. यामुळे सूर्यफूल बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

तेलबियांचे दर टिकून आहेत. तेलबियांना उठावदेखील आहे. सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा तेजी येत आहे. तसेच भुईमूग, सूर्यफुलाचे दरही टिकून आहेत. भुईमुगाचे एकरी १२ ते १३ क्विंटल उत्पादन अनेक शेतकऱ्यांना आले. त्याचे दरही बऱ्यापैकी मिळाले. तसेच सूर्यफुलाचे उत्पादनदेखील एकरी २० ते २२ क्विंटल एवढे आले.

त्याचे दरही प्रतिक्विंटल सहा हजारांपर्यंत मिळाले. यामुळे शेतकरी सूर्यफूल पेरणीकडे वळले आहेत. खानदेशात यंदा भुईमुगाची मिळून पाच हजार हेक्टरवर तर सूर्यफुलाची देखील सुमारे अडीच ते तीन हजार हेक्टरवर पेरणी होईल. सातपुडा पर्वत भागात ही पेरणी अधिक असणार आहे. जलसाठेही मुबलक आहेत.

अनेक शेतकरी ठिबकवर भुईमूग पेरणीचे नियोजन करीत आहेत. काही शेतकरी तुषार सिंचनाचा उपयोग करून भुईमूग लागवडीचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील पाल (ता. रावेर), ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रदेखील पुढाकार घेत आहेत.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमध्ये तळोदा, शहादा भागांत भुईमूग लागवड वाढेल, असे संकेत आहेत. तर सूर्यफुलाची पेरणी सर्वत्र कमी अधिक क्षेत्रात होईल. सूर्यफूल बियाण्यांचा काळाबाजारही सुरू आहे. बियाण्यासंबंधी १२०० रुपयांना एक बॅग मिळत आहे. काही भागांत बियाणे मुबलक नाही, अशीही माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT