Jowar Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Jowar Sowing : उन्हाळी ज्वारी लागवड तंत्र आणि महत्वाचे वाण

Jowar Sowing : ज्या शेतकऱ्यांकडे कमी- जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध असते असे शेतकरी उन्हाळी हंगामात ज्वारीची पेरणी करतात. विशेषत: मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात उन्हाळीज्वारीची लागवड केली जाते.

Team Agrowon

Summer Season : ज्या शेतकऱ्यांकडे कमी- जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध असते असे शेतकरी उन्हाळी हंगामात ज्वारीची पेरणी करतात. विशेषत: मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात उन्हाळीज्वारीची लागवड केली जाते. उन्हाळी ज्वारी पेरणीची योग्य वेळ, वाण कोणते निवडायचे? याशिवाय व्यवस्थापनाविषयीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत. 

उन्हाळी ज्वारीची डिसेंबरमध्ये पेरणी केल्यास अतिथंडीमुळे ज्वारीची उगवण होत नाही. तर पेरणी जर फेब्रुवारीच्या पुढे केली तर हे पीक जास्त तापमानात फुलोऱ्यात येते. त्यामुळे त्यात दाणेच भरत नाहीत त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते. उन्हाळी ज्वारीच्या पेरणीची योग्य वेळ हा संक्रांतीच्या जवळपासचा मानला जातो. त्यामुळे उन्हाळी ज्वारीची पेरणी ही १५ ते २० जानेवारीच्या दरम्यान विशेषतः रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअस होईल, तेव्हा करावी.

वाणांची निवड

वाणांची निवड करताना उन्हाळी हंगामात जास्त कडबा उत्पादनासाठी नेहमीच्या खरीप हंगामातील वाणांची पेरणी करण्याऐवजी रब्बीसाठी शिफारस केलेल्या सुधारित वाणांचा वापर करावा. कारण खरीप वाणाच्या पेरणीमध्ये वातावरणानुसार मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे एकूणच अपेक्षित उत्पादन मिळत नाही.

ज्वारीच्या मालदांडी-३५-१ या लोकप्रिय वाणांबरोबरच परभणी मोती, परभणी ज्योती, फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा, तसेच अकोला क्रांती या वाणांचे बियाणे पेरणीसाठी वापरता येईल. बियाणांसाठी या वाणांची पेरणी करणार असल्यास कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या शुद्ध बियाणांचा वापर करावा.  

खरीप हंगामासाठी शिफारस केलेले पी. वी. के. ८०१ म्हणजेच परभणी श्वेता या वाणाचीही बियाणांसाठी पेरणी करता येते. या काळात बियाणांचा आकार लहान राहत असला तरी कणसांतील एकूण बियाच्या संख्येमध्ये वाढ होते.  त्यामुळे येत्या खरीप हंगामासाठी उत्तम बियाणे उपलब्ध होते. अशा बियाणांची उगवण ९० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी हेक्टरी ७.५ किलो बियाणे पुरेसे होते.

जमिनीची निवड व बीजप्रक्रिया

ज्वारी लागवडीसाठी शक्यतो मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास ३०० मेश गंधकाची शिफाशीत प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. उन्हाळी ज्वारी पूर्णपने ओलिताखालीच घेतली जाते. या ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी दोन ओळीतील अंतर ४५ सेंटीमीटर म्हणजेच १८ इंच ठेवावे. त्यासाठी हेक्टरी १२ किलो बियाणे वापरव. उन्हाळी ज्वारीला साधारणपणे ५- ७ पाण्याच्या पाळ्या देण्याची गरज असते. ज्वारी पाण्याच्या पाळ्यास चांगला  प्रतिसाद देते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या वाढीच्या काळात ज्वारीला पाणी द्याव. अशा प्रकारे उन्हाळी ज्वारीच्या योग्य वाणाची निवड करुन पेरणी केल्यास उन्हाळी ज्वारीचं चांगल उत्पादन मिळेल. 

-----------

माहिती आणि संशोधन - वसंतदादा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT