Summer Jowar Sowing : यंदाच्या उन्हाळी हंगामात ज्वारी ठरेल फायद्याची

Mahesh Gaikwad

रब्बी हंगाम

यंदा रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्यांना बऱ्याच ठिकाणी उशीराने झाल्या आहेत. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

Summer Jowar Sowing | Agrowon

ज्वारी दर

कमी उत्पादनामुळे यंदा ज्वारीला दरही चांगला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी उन्हाळी हंगामात ज्वारीची लागवड करावी.

Summer Jowar Sowing | Agrowon

ज्वारी पेरणी

ज्वारीची पेरणी साधारणतः फेब्रुवारी महिन्यानंतर केल्यास हे पीक अधिक तापमानात फुलोऱ्यात येते. परिणामी त्यात दाणेच न भरल्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.

Summer Jowar Sowing | Agrowon

पेरणीचा काळ

त्यामुळे उन्हाळी ज्वारीच्या पेरणीची योग्य कालावधी हा संक्रांतीच्या जवळपासचा मानला जातो.

Summer Jowar Sowing | Agrowon

Summer Jowar Sowingउन्हाळी ज्वारी

उन्हाळी ज्वारीची पेरणी करण्यासाठी १५ ते २० जानेवारी दरम्यान विशेषतः रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअस असेल त्यावेळीच करावी.

Summer Jowar Sowing | Agrowon

ज्वारीचे वाण

उन्हाळी हंगामात अधिक कडबा उत्पादनासाठी नेहमीच्या खरीप हंगामातील वाणांची पेरणीकरण्याऐवजी रब्बीसाठी शिफारसीत सुधारित वाणांचा वापर करावा.

Summer Jowar Sowing | Agrowon

मालदांडी ज्वारी

उन्हाळी हंगामासाठी मालदांडी-३५-१ या लोकप्रिय वाणांबरोबरच परभणी मोती, परभणी ज्योती, फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा, तसेच अकोला क्रांती या वाणांचे बियाणे पेरणीसाठी वापरता येईल.

Summer Jowar Sowing | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....