Mung  Agrowon
ॲग्रो विशेष

Mung Cultivation : वाशीम जिल्ह्यात उन्हाळी मूग लागवडीला सुरुवात

Mung Production : यंदाच्या हंगामातील मुगाची लागवड सुरू झाली असून पेरण्यांची कामे जोमाने होत आहेत.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात उन्हाळी हंगामात मुगाचे पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. यंदाच्या हंगामातील मुगाची लागवड सुरू झाली असून पेरण्यांची कामे जोमाने होत आहेत.

मागील काही वर्षात मुगाचे पीक सर्वाधिक बेभरवशाचे बनलेले आहे. विविध प्रकारचे व्हायसर मुगाच्या पिकाला दर वर्षी हंगामात फटका देतात. यामुळे खरिपातील मुगाची लागवड अत्यंत कमी होत आहे.

आता सिंचनाची सोय असलेले शेतकरी उन्हाळी मुगाच्या लागवडीकडे वळू लागले आहेत. जिल्ह्यात सध्या या लागवडीला वेग आला. रिसोड तालुक्यात विविध गावांमध्ये उन्हाळी मुगाच्या पेरणीच्या अनुषंगाने कामे आहेत. खरिपातील तुरीचे पीक काढून झाल्यानंतर तातडीने मूग लागवडीसाठी शेत तयार करण्यात येत आहेत.

रिसोड भागात उन्हाळी मुगाची उत्पादकता एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंत राहत आहे. या मुगाला दर सुद्धा साधारणतः आठ हजारांपर्यंत मिळतो. मुगाच्या पिकाला एकरी खर्च साधारणपणे साते आठ हजारांदरम्यान होत असल्याचे शेतकरी सांगतात.

७५ दिवसांत हे पीक काढणीला तयार होत असल्याने खरीप हंगामातील लागवडीपूर्वी शेतीला काही दिवस आरामही मिळू शकतो. यामुळे मुगाचे पीक सर्वार्थाने फायदेशीर होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

आमच्या एकट्या गावात १०० एकरांपर्यंत उन्हाळी मुगाची लागवड राहते. मागील काही हंगामापासून आम्ही ही लागवड करीत असून या वर्षी दोन एकरांत मुगाची नुकतीच पेरणी केली.
शुभम खडसे, शेतकरी, शेलू खडसे, ता. रिसोड, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

Agriculture Tools Bank: महिला गटांसाठी कृषी अवजारे बँक

Maharashtra Rain Alert: वादळी पावसासह उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT