Summer sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : तालुक्यातील राजेगाव परिसरात पाण्याअभावी शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाच्या पिकाची लागवड कमी प्रमाणात केली आहे.

Team Agrowon

Pune News : तालुक्यातील राजेगाव परिसरात पाण्याअभावी शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाच्या पिकाची लागवड कमी प्रमाणात केली आहे. परिणामी यंदा उत्पादनात सुमारे ४० इतकी घट झाली आहे.

राजेगाव परिसरातील नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्डी या परिसरांत मार्च महिन्यातच भीमानदी कोरडी पडली आहे. शिवाय यंदा विहिरी, कूपनलिका यांची पाणीपातळी समाधानकारक नसल्याने कमी प्रमाणावर उन्हाळी भुईमुगाची लागवड झाल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे.

दर वर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत या भागात उन्हाळी भुईमुगाची लागवड केली जाते. भुईमुगाचे पीक कमी पाण्यावरही तग धरत असल्याने हे पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो.

रानडुकरांचा उपद्रव ः आर्थिक नुकसान

वनक्षेत्र आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात काही व्यावसायिकांनी छुप्या पद्धतीने रानडुकरे सोडली आहेत. त्यांना कोवळा मका आणि भुईमूग ही दोन्ही पिके फार आवडतात. भुईमूग काढणीला येण्याच्या ऐन वेळी रानडुकरे भुईमुगाच्या पिकांचे नुकसान केले. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे.

ऊसपिकात आंतरपीक म्हणून उन्हाळी भुईमूग पीक घेता येते. ऊस पिकाबरोबर भुईमुगाची वाढ चांगली होते. भुईमूग पीक आपल्या मुळांवर नत्रांचे स्थिरीकरण करते. त्याचा ऊस पिकाला फायदा मिळतो. उसासाठी दिलेले पाणी या पिकासही उपयुक्त ठरते. यामुळे अधिक उत्पादन मिळते.
- तेजश्री ढवळे, कृषी सहायक, राजेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT