Summer crops sowing Agrowon
ॲग्रो विशेष

उन्हाळ पिकांच्या लागवडीत ७ टक्क्यांनी वाढ

२२ एप्रिल अखेरीस देशभरात ६४ लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात देशभरातील ६० लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आली होती.

Team Agrowon

उन्हाळ पिकांच्या लागवडीत यंदा ७ टक्क्यांची वाढ झाली असून २२ एप्रिल अखेरीस देशभरात ६४ लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात देशभरातील ६० लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आली होती.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार (Union Agriculture Ministry), यंदा कडधान्य (Pulses) लागवड क्षेत्रात ५३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. १४.१८ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची (Pulses) लागवड करण्यात आली आहे. त्यातही मुगाच्या लागवड क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या उन्हाळ्यातील ६.९३ लाख हेक्टर क्षेत्रातील मूग लागवडीच्या तुलनेत यंदा १०.४७ लाख हेक्टर क्षेत्रात मुगाची लागवड करण्यात आली आहे.

उन्हाळ लागवडीस आणखी १५ दिवस बाकी असून या काळात कडधान्य (Pulses) लागवडीचे प्रमाण वाढले तर त्याचा लाभ होऊ शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यंदा बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बीची कापणी झाल्यानंतरच लगेच उन्हाळ पिकांची लागवड केली असल्याचे निरीक्षण कडधान्य प्रक्रिया उद्योग क्षेत्राकडून नोंदवण्यात आले आहे.

उन्हाळ लागवडीत एकीकडे कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढलेले असताना भातपिकाच्या (Paddy Cultivation) लागवड क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत घट पहायला मिळत आहे. यंदा २८.८७ लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची (Paddy) लागवड करण्यात आली आहे, गेल्यावर्षी याच कालावधीत ३०.६१ लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात आली होती.

यंदा १०.६१ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची (Oil seeds) लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १०.२६ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची (Oil seeds ) लागवड करण्यात आली होती. तृणधान्य लागवडीचे क्षेत्रही यंदा ६४ हजार हेक्टरने वाढले आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यातील ६.२३ लाख हेक्टर क्षेत्रावरील मका (Maize) लागवडीच्या तुलनेत यंदा ६.२१ लाख हेक्टर क्षेत्रात मक्याची (Maize) लागवड करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT