Water Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Kukdi Irrigation Project : मीना शाखा आणि घोड शाखा कालव्यात उन्हाळी आवर्तन

Summer Water Management: कुकडी प्रकल्पाअंतर्गत डिंभे व वडज धरणातून मीना शाखा व घोड शाखा कालव्यात बुधवारी (ता. ७) सकाळपासून पाणी सोडण्यात आले. ‘टेल टू हेड’ या पद्धतीने या पाण्याचा वापर जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यांतील नागरिकांना होणार आहे.

Team Agrowon

Narayangaon News: कुकडी प्रकल्पाअंतर्गत डिंभे व वडज धरणातून मीना शाखा व घोड शाखा कालव्यात बुधवारी (ता. ७) सकाळपासून पाणी सोडण्यात आले. ‘टेल टू हेड’ या पद्धतीने या पाण्याचा वापर जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यांतील नागरिकांना होणार आहे. कालव्यातील पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी होऊ नये, यासाठी कालवा परिसरात २४ तास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे यांनी दिली.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ६ मेपासून मीना शाखा व घोड शाखा या कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे बुधवारी सकाळपासून मीना शाखा कालव्यात ४०० क्यूसेकने, तर घोड शाखा कालव्यात १०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले.

वडज धरणातून १०० क्यूसेकने मीनापूरक कालव्यात पाणी सोडून हे पाणी आर्वीजवळ डिंभे डावा कालव्यात सोडण्यात आले. डिंभे व वडज धरणातील एकूण ४०० क्यूसेकने पाणी मीना शाखा कालव्यात सोडले आहे. जुन्नर व शिरूर तालुक्यांना जोडणारा मीना शाखा कालवा ४० किलोमीटर लांबीचा आहे, तर घोड शाखा कालवा १३ किलोमीटर लांबीचा आहे. मीना शाखा कालव्यातील पाणी पुढील तीन दिवसांत शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक या गावात पोहोचणार आहे.

आवर्तनाच्या वेळा

कालव्यातील पाण्याचा शेती सिंचनासाठी वापर होऊ नये म्हणून कालवा निरीक्षकांची नेमणूक केली आहे. पाण्याचा काटेकोरपणे वापर केला जाणार आहे. मीना शाखा कालव्यात सोडलेले उन्हाळी आवर्तन १९ मे रोजी, तर घोड शाखा कालव्यातील आवर्तन २७ मे रोजी बंद करण्यात येणार आहे. या आवर्तनात ०.६४ टीएमसी पाणी वापर होणार आहे, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे यांनी दिली.

पोहण्याचा मोह टाळा

कालव्यात सोडलेल्या पाण्याचा प्रवाह वरून संत दिसत असला तरी पाण्याला वेग जास्त आहे. त्यामुळे कालव्यातील पाण्यात अंघोळ करण्याचा मोह टाळावा, असे आवाहन कुकडे पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT