Bajara Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Farming : उन्हाळी बाजरी, तीळ लागवडीचे नियोजन

Crop Planning : उन्हाळी बाजरी व तीळ लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने बियाण्यांची निवड, जमिनीची मशागत, सिंचन व्यवस्थापन आणि खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढवता येईल.

डॉ. आदिनाथ ताकटे 

Summer Agricultural Planning :

उन्हाळी तीळ

मध्यम भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी, वालुकामय, पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओल असल्यास पीक चांगले येते.

पेरणी  पेरणी ३० बाय १५ सेंमी किंवा ४५ बाय १० सेंमी अंतरावर करावी.  तिळाचे बी आकाराने लहान असल्याने बी वाळू, राख, माती किंवा शेणखतामध्ये मिसळून पेरणी करावी.  हेक्टरी २.५ ते ३ किलो बियाणे पुरेसे होते.

वाण

जे. एल. टी ४०८-२ (फुले पूर्णा), ए. के. टी. -१०१ (९० ते ९५ दिवस)

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास, थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम, ॲझोटोबॅक्टर व पी. एस बी. प्रत्येकी २५ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

उन्हाळी बाजरी

मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

जमिनीची १५ सें.मी. खोल नांगरणी करावी. कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी.

शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी १० ते १५ गाड्या शेणखत शेतात पसरावे.

वाण

संकरित वाण : आदिशक्ती, फुले महाशक्ती, जेएचबी ५५८

सुधारित वाण : धनशक्ती, आयसीएमव्ही २२१

बीजप्रक्रिया

अरगट रोगाच्या नियंत्रणासाठी, २० टक्के मिठाच्या द्रावणाची बियाणास बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे.

गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी, प्रतिकिलो बियाणास मेटॅलॅक्झील (३५ एस डी) ६ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे चोळावे. त्यानंतर जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी

अझोस्पिरीलम किंवा अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणांरे जिवाणू (पीएसबी) यांची २५ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

पेरणी

पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी.

पेरणी दोन चाडाच्या पाभरीने ३० बाय १५ सेंमी अंतरावर करावी. पेरणी २ ते ३ सेंमी पेक्षा जास्त खोलीवर करू नये.

हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे पुरेसे होते.

खत व्यवस्थापन

पेरणी करताना नत्र, स्फुरद, पालाश प्रत्येकी ४५ किलो प्रमाणे द्यावे. उर्वरित ४५ किलो नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी खुरपणी केल्यानंतर द्यावे.

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT