Team Agrowon
बाजरी हे जिरायतीमधील महत्त्वाचे तृणधान्य पीक असले उन्हाळी हंगामात घेताना ओलिताखाली घ्यावे लागते.
पोषकता आणि पचनीयतेच्या दृष्टीने सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या या भरडधान्याचा वापर आता वेगाने वाढत आहे.
जमीन : उन्हाळी बाजरी लागवडीसाठी जमीन मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.
हवामान : बाजरी या पिकास उष्ण व कोरडे हवामान (१० ते ४५ अंश सेल्सिअस) मानवते. हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.
पेरणीची वेळ : उन्हाळी बाजरीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या तारखेपर्यंत करावी.
बियाणे प्रमाण : पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे.
पेरणीची पद्धत : पेरणीपूर्वी शेत ओलावून वाफसा आल्यावर पेरणी करावी. जमिनीच्या उतारानुसार ५ ते ७ मीटर लांबीचे व ३ ते ४ मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत.
Vegetable Grafting : भाजीपाला पिकातील कलम तंत्राचे फायदे ओळखा उत्पादन वाढवा