Nashik Sukhoi Crash Agrowon
ॲग्रो विशेष

Sukhoi Crash Compensation : सुखोई विमान दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांना ३२ लाखांची मदत

HAL Relief To Farmer : नियमित सरावासाठी ४ जून २०२४ रोजी उड्डाण केलेले लष्कराचे ‘सुखोई एस बी १८२’ हे लढाऊ विमान निफाड तालुक्यातील शिरसगाव शिवारात कोसळले होते.

Team Agrowon

Nashik News : नियमित सरावासाठी ४ जून २०२४ रोजी उड्डाण केलेले लष्कराचे ‘सुखोई एस बी १८२’ हे लढाऊ विमान निफाड तालुक्यातील शिरसगाव शिवारात कोसळले होते. या विमान दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांच्या द्राक्ष बाग, कोथिंबीर, टोमॅटो पीक लागवड क्षेत्रासह विहिरीचे नुकसान झाले होते.

आता तब्बल दहा महिन्यांनंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड(एचएएल) कडून शिरसगाव येथील विमान दुर्घटनाग्रस्त तीन शेतकऱ्यांना ३२ लाखांची मदत थेट खात्यावर सुपूर्द करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील शिरसगाव वडाळीनजीक शिवारात ‘सुखोई एसबी १८२’ या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते कोसळले होते.

४ जून २०२४ ला दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली होती. विमान कोसळताच त्यास आग लागल्याने धुराचे लोळ उंचीवर गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेसह टोमॅटो, कोथिंबीर पीकक्षेत्र व विहिरीचे नुकसान झाले होते.

एचएएल प्रशासनाकडून घटनेचा आढावा घेत नुकसानीचे पंचनामे केले होते. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकरी सुखदेव मोरे यांच्या द्राक्षशेतीचे नुकसान झाल्याने त्यांना २६ लाख रुपये मदत मिळाली.

ज्ञानेश्वर मोरे या शेतकऱ्याचे टोमॅटो पिकासह विहिरीचे नुकसान झाल्याने त्यांना ५ लाख ८० हजारांची मदत देण्यात आली. लक्ष्मण मोरे यांच्या कोथिंबीर पिकाचे नुकसान झाल्याने त्यांना ७३ हजारांची मदत ‘एचएएल’ प्रशासनाकडून थेट खात्यावर सुपूर्द करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT