Kolhapur Farmer agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Farmer : त्रास देणाऱ्यांची भिंतीवर नावं लिहत तरूण शेतकऱ्याची आत्महत्या, कोल्हापुरातील घटना

Suicide Young Farmer : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात एका तरूण शेतकऱ्याच्या बाबतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात एका तरूण शेतकऱ्याच्या बाबतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्रास दिलेल्यांची नावे गोठ्यातील भिंतीवर कोळशाने लिहत तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली.

सिद्धेश्वर रामचंद्र कानडे असे त्याचे नाव आहे. काल (ता.०९) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान या घटनेने भागात जोरदार चर्चा सुरू होती.

गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ बसथांब्यानजीक राहणारा सिद्धेश्वर कानडे हा शेतीबरोबरच भाजीपाला व फळे विक्रीचा व्यवसाय करायचा. परंतु कर्जाचे डोंगर वाढल्याने नैराश्य पत्करून तो दारूच्या खूप आहारी गेला. या सगळ्यात त्याच्या पत्नीनेही त्याची साथ सोडत मुलांसह माहेरी राहत होती.

सोमवारी दपारी आई बाजारासाठी गडहिंग्लजला गेली होती. त्यावेळी घरी कुणी नसल्याचे पाहून त्याने राहत्या घरालगतच्या जनावरांच्या गोठ्यातील तुळईला दारूच्या नशेतच दोरीने गळफास लावून घेतला.

दरम्यान, बाजार करून आल्यानंतर त्याची आई जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेली होती. त्यावेळी सिद्धेश्वर याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे. याबाबत गडहिंग्लज पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

उत्तर येथील दूध संस्था, गडहिंग्लज येथील महिलेसह दुंडगे व गडहिंग्लज येथील एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे सिद्धेश्वर याने गोठ्यातील भिंतीवर कोळशाने लिहून ठेवले असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT