Sugarcane Trash Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Trash Management : सेंद्रिय कर्ब वाढीसाठी पाचट व्यवस्थापन महत्त्वाचे

Organic Carbon : शेतकऱ्यांनी जमिनीची जडणघडण समजून घेण्यासाठी माती परीक्षण केले पाहिजे. माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन केले पाहिजे.

Team Agrowon

Sangli News : शेतकऱ्यांनी जमिनीची जडणघडण समजून घेण्यासाठी माती परीक्षण केले पाहिजे. माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन केले पाहिजे. तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढीसाठी पाचट व्यवस्थापनासह शेखणत, हिरवळीची खतांचा वापर केल्याने सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जयवंत जगताप यांनी व्यक्त केले.

वाटेगाव (ता. वाळवा) येथे ॲग्रोवन व रिवुलिस इरिगेशन इ. प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादन तंत्रज्ञान व पाणी व्यवस्थापन या विषयावर ‘ॲग्रो संवाद’चे चर्चासत्र झाले. या वेळी डॉ. जगताप बोलत होते. या वेळी रिवुलिस इरिगेशन इ. प्रा. लि.चे विभागीय व्यवस्थापक सागर पिसे, वैभव चौगुले, वितरक विकास पाटील, धीरज चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

डॉ. जगताप म्हणाले, की शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन केले पाहिजे. त्यामुळे पिकाला गरजेनुसार खतांची उपलब्धता होते. दर्जेदार बेणे, रुंद सरीचा वापर करणे आवश्यक आहे.

त्यामुळे सरी रुंद असल्याने प्रकाश संश्लेषण, हवा खेळती रहात, अन्नद्रव्ये अधिक तयार होते. यामुळे उसाच्या कांड्याची जाडी, लांबी वाढण्यास मदत होते. पिकांची फेरपालट, गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खतासह पाचट माती आड केल्याने जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते.

रिवुलिस इरिगेशन इं. प्रा. लि.चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव म्हणाले, की आमच्या कंपनीने जगातील १२० पेक्षा अधिक देशांमध्ये काम केले आहे. इस्राईलस्थित असणाऱ्या कंपनीने उपग्रहाद्वारे पीकपाणी नियोजन विकसित केले आहे. मान्ना इरिगेशन अॅपद्वारे शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या आहेत.

शेतकऱ्यांना पाणी बचतीसाठी योग्य ते मार्गदर्शन या अॅपद्वारे केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रिवुलिसचा ड्रीपरचा दर्जा चांगला असल्याने पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा सर्वदूर एकसमान विसर्गाची खात्री रिवुलिसद्वारे दिली जाते. अभिजित डाके यांनी प्रास्ताविक केले. दत्ता कोळी यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT