Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti: ऊस तोडणी मुकादमांकडील वसुलीबाबत कार्यवाही करावी

Raju Shetti Demands: गेल्या वर्षभरामध्ये संपुर्ण राज्यात जवळपास २ हजार हून अधिक ऊस वाहतूकदारांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमावर गुन्हे दाखल झालेले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने बैठक घेऊन वसुलीसंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.

Team Agrowon

Mumbai News : गेल्या वर्षभरामध्ये संपुर्ण राज्यात जवळपास २ हजार हून अधिक ऊस वाहतूकदारांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमावर गुन्हे दाखल झालेले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने बैठक घेऊन वसुलीसंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात वाहतूकदार शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन केली.

राज्यातील ऊस तोडणी मुकादमांवर ४२० व इतर कलमांअंतर्गत गुन्हे दाखल होऊनही याबाबत पोलिस यंत्रणेकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. राज्यातील बड्या नेत्यांच्या वरदहस्तामुळे वाहतूकदार यांची फसवणूक केलेले मुकादम बिनबोभाट फिरू लागले आहेत. हे गुन्हे निपटारा होण्यासाठी फार कालावधी होत आहे.

त्यामुळे ऊस वाहतूकदारांना बँका व पतसंस्थांच्या मुद्दल व व्याजाचा भुर्दंड बसत असून ऊस वाहतूकदार पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत, यामुळे विशेष बाब म्हणून ४२० अंतर्गत कायद्यामध्ये योग्य तो बदल करून फसवणूक करणाऱ्यांचे गुन्हे फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून तातडीने निर्णय लावण्याची मागणी करण्यात आली.

वसुलीसाठी गेलेल्या पोलिसांना व वाहतूकदार यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून वाहतूकदार यांचा कोट्यवधी रुपयांचा अॅडव्हान्स बुडविण्याचा कट रचला जात आहे. ज्या मुकादमांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वाहतूकदारांनी अॅडव्हान्स पोटी दिलेल्या रकमेइतका महसुली बोजा चढवून वसुलीबाबत यंत्रणा गतिमान करणे गरजेचे आहे.

यामुळे राज्य सरकारने ऊस तोडणी मजुरांकरिता सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी महामंडळात ऊस वाहतूकदार यांचाही समावेश करून राज्यातील ऊस वाहतूकदार यांनाही सरंक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी संदीप राजोबा, राजू पाटील, रावसाहेब अबदान, दादा पाटील, विनोद पाटील, तानाजी पाटील यांच्यासह वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT