Sugarcane Rate Protest agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate Protest : कोल्हापूर ऊसदर आंदोलन! चालू ट्रॅक्टर थांबवून पेटवला, चंदगडमधील घटना

Kolhapur Sugarcane : कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ, हातकणंगले, कागल तालुक्यातनंतर आता चंदगड तालुक्यात ऊस दराच्या आंदोलनाच्या भडका उडाला आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane FRP News : कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ, हातकणंगले, कागल तालुक्यातनंतर आता चंदगड तालुक्यात ऊस दराचे आंदोलन जोरदार पेटले आहे. चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याकडे कर्नाटकातील रस्त्यावरून ऊस घेऊन येताना चंदगड तालुक्यातील ट्रॅक्टरवर अज्ञात व्यक्तींनी पेट्रोलचे गोळे फेकून रस्त्यावरच ट्रॅक्टर पेटवल्याची घटना घडली. आगीत ट्रॅक्टर जळून खाक झाला.

कर्नाटकातील बोडकेनट्टी येथे गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ट्रॅक्टर मालक उत्तम अर्जून कागणकर (रा. तावरेवाडी, ता. चंदगड) यांनी कर्नाटक पोलिसांत घटनेची नोंद केली आहे.

घटनास्थळावरून मिळेलेली माहिती अशी, उत्तम कागणकर यांचा ट्रॅक्टर हेमरस साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करतो. महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसदरासाठी आंदोलन सुरू असल्याने महाराष्ट्रातून ऊस वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे कागणकर यांनी कर्नाटकातील रस्त्यावरून ऊस वाहतूक सुरू केली होती.

गेल्या आठ दिवसांपासून उसाची वाहतूक सुरू होती. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कर्नाटकातील बोडकेनहट्टी गावाजवळ अज्ञात चार व्यक्तींनी ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला. चालू ट्रॅक्टरमधून चालकाला ओढून बाहेर काढले. चालू ट्रॅक्टर चढतीला असल्याने तो मागे गेला व त्यामुळे चारचाकी ट्रॉली उलटली.

यामध्ये ट्रॉली व उसाचेही नुकसान झाले. ट्रॅक्टर रस्त्यावर थांबल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टरवर पेट्रोलचे गोळे फेकून ट्रॅक्टर पेटवून दिला. चालकाने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर पेटवून संबंधित पळून गेले.

चालकाने तत्काळ ट्रॅक्टर मालक उत्तम कागणकर यांना फोनवरून ही माहिती दिली. तासाभरात लोक जमा झाले, पण तोपर्यंत ट्रॅक्टर जळून खाक झाला होता. घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT