Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : उसाचे दर अद्याप जाहीर नाहीत

Sugarcane Crushing Season : उसाचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना होत आलेला असतानाही अहिल्यानगर जिल्ह्यात सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी उसाचा दर अजूनही जाहीर केलेला नाही.

Team Agrowon

Ahilyanagar News : उसाचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना होत आलेला असतानाही अहिल्यानगर जिल्ह्यात सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी उसाचा दर अजूनही जाहीर केलेला नाही. ऊसदर जाहीर करण्याबाबत कारखानदार गप्प असून शेतकऱ्यांना मात्र या वर्षी किती दर मिळणार या बाबत प्रतीक्षा आहे.

अहिल्यानगर हा उसाचा आणि साखर कारखान्यांचा जिल्हा आहे. राहाता, राहुरी, कोपरगाव, अकोले, संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर, श्रीगोंदा यासह धरणांचा पट्टा असलेल्या शेवगाव, जामखेडमध्ये उसाचे क्षेत्र अधिक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील नेते, कारखानदार निवडणुकीत असल्याने विधानसभा निवडणुकीमुळे यावर्षी पंधरा दिवस साखर कारखान्याचा गाळप हंगाम उशिराने सुरू झाला.

आता गाळप हंगाम सुरू होऊन महिना होत आला आहे. मात्र उसाचे आगार समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन देखील उसाचा दर ठरला नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात १६ साखर कारखाने सुरू झाले, तरी उसाच्या दराची कोंडी अजूनही फुटलेली नाही. ऊस लागवड करत असताना शेतकऱ्याला एकरी एक लाख रुपये खर्च येतो. खते, मशागतीचा खर्च, वाढलेली मजुरी, यात शेतकरी मेटाकुटीला येतो.

कारखाना चालकांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३५०० रुपये दराने पहिली उचल द्यायला हवी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र उसाचा दर जाहीर करण्याबाबत कारखानदार गप्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसदर जाहीर कधी होणार या बाबत प्रतीक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी होऊनही कारखानदार ऊसदर जाहीर करत नसल्याने काही शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

शेतकरी नेतेही गप्प

विधानसभा निवडणूक झाल्याने निवांत झालेल्या कारखानदारांकडून ऊसदराबाबत आता कोणीही बोलायला तयार नाहीत. उसाचा दर जाहीर केला नाही तर शेतकरी संघटना यापूर्वी तीव्र लढा उभारायच्या. यंदा मात्र ऊसदराबाबत जसे कारखानदार गप्प आहेतच, पण शेतकरी संघटनांचे नेतेही गप्प आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना साऱ्यानीच वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT