Sugarcane Price Sangli agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Price Sangli : सांगली जिल्ह्यात ऊस दराचा तोडगा निघणार? कारखानदार, शेतकरी संघटनांची बैठक

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्ते यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

sandeep Shirguppe

अभिजीत डाके

Sangli Sugarcane Price : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दत्त इंडिया कारखान्यात तब्बल २८ तास आंदोलनानंतर जिल्हाधिकारी, साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक सोमवार (ता.११) पाच वाजता होणार आहे. या बैठकीत कोल्हापूर पॅटर्न प्रमाणेच सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा अशी मागणी केली जाणार आहे.

सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न रविवारपासून पेटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्ते यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. मात्र ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी प्रशासन आणि दत्त इंडियाचे प्रशासन यांच्याकडून दुपारपर्यंत कोणत्याही हालचालीस सुरू नव्हत्या.

दरम्यान वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी चर्चा केली. मात्र ही चर्चा सफल झाली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जिल्हा प्रशासनाबरोबरच बैठक घ्यावी असा आग्रह धरला. त्यामुळे दुपारनंतर जिल्हाधिकारी यांच्याशी कारखाना प्रशासनाने संपर्क साधून जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दुपारी दोनच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेण्याचा निर्णय झाला.

त्यामुळे आज (ता.११) पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील साखर कारखानदार ऑनलाईन उपस्थित राहणार असून श्री शेट्टी ही ऑनलाईन पद्धतीने चर्चा करणार आहेत. त्यामुळे ऊस दराची चर्चा काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे सांगलीतील साखर कारखाने दर द्यावेत ही मागणी घेऊनच या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT