Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : ऊस तोडणी कामगार परतीच्या मार्गावर

Sugarcane Harvesting : एप्रिल महिन्याचे पंधरा दिवस संपल्याने साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपण्यास सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Pune News : एप्रिल महिन्याचे पंधरा दिवस संपल्याने साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील २८ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला असून कारखानास्थळी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. सध्या अवघे तीन साखर कारखाने सुरू असल्याने तोडणी मजूर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत, अशी माहिती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे साखर कारखाने गळीत हंगाम लवकर संपवू लागले आहे. त्यातच पाणी टंचाईची वाढती तीव्रता व जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची स्थिती बघता एप्रिलअखेरीस साखर कारखाने बंद होतील, असे बोलले जात होते. यंदा गळीत हंगामात सुमारे ३१ साखर कारखाने सुरू झाले होते.

सध्या पुणे जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईची झळ वाढू लागली आहे. त्यामुळे उसासह, सर्वच पिकांना पाणीटंचाईचा फटका बसू लागला असून कारखान्यांनाही ऊस मिळण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. चालू वर्षी उसाची उपलब्धता अधिक असल्याने शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, उशिराने झालेल्या पावसामुळे गळीत हंगाम सुरू होण्यास विलंब झाला.

त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी उशिराने साखर कारखाने सुरू केले होते. विभागातील पुणे, सातारा जिल्ह्यांतील १० नोव्हेंबरनंतर साखर कारखान्यांचे धुराडे पेटवत गाळप हंगाम सुरू केला. त्यानंतर टप्याटप्याने इतर कारखान्यांचाही गळीत हंगाम सुरू झाला होता. त्यामुळे कारखाना कार्यस्थळावर चांगलीच लगबग पाहावयास मिळाली होती. किराणा दुकाने, हॉटेल यांचाही ऊस हंगामात तेजीत धंदा सुरू होता.

यंदा सुमारे साडेपाच महिने साखर कारखाने सुरू राहिले आहेत. पुणे विभागात हंगामात ३४ साखर कारखान्यांपैकी ३१ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला होता. विभागात सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना १२ फेब्रुवारी, तर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखाना २८ फेब्रुवारी रोजी गळीत हंगाम बंद केला. त्यानंतर इतर कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत पुणे विभागात गाळप हंगाम

एकूण सुरू झालेले साखर कारखाने -- ३१

दैनंदिन गाळप क्षमता (टन) -- २,०४,९५०

एकूण ऊस गाळप (टन) -- २,३४,५७,१२८

साखर उत्पादन (क्विंटलमध्ये) -- २,४६,१९,६०३

सरासरी साखर उतारा (टक्के) -- १०.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT