Sugarcane Harvester Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : जळगावात ऊस तोडणी लांबणीवर

Sugarcane Season : अनेक भागांत ऊस तोडणीवर आला आहे. ऊस तोडणीबाबत अनेक कारखान्यांनी खानदेशात तयारी केली होती.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात काही भागात लांबलेल्या पावसामुळे शेतांत वाफसा नसल्याने ऊस तोडणीदेखील रखडणार आहे. अनेक भागांत ऊस तोडणीवर आला आहे. ऊस तोडणीबाबत अनेक कारखान्यांनी खानदेशात तयारी केली होती.

दिवाळीलाच तोडणीचा मुहूर्त व बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात आले होते. परंतु पावसामुळे ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले आहे. ऊस तोडणीवर असताना पाऊस सुरू असल्याने पुढे त्याचे वजन व अन्य बाबींवर परिणाम होणार आहे.

अनेक शेतांत तण वाढले आहेत. तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकांची फवाारणीदेखील केली. परंतु सततच्या पावसाने तण वाढतच आहे. त्यातही उसाच्या उत्पादकतेवर परिणाम होईल, अशी स्थिती आहे.

काही शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून ऊस पीक वाढविले आहे. परंतु तोडणी वेळेत झाल्यास उतारा चांगला मिळतो. तसेच क्षेत्रही लवकर रिकामे होते. त्यात पुढे खोडवा किंवा अन्य पीक कार्यवाही करावी लागते.

खानदेशात मागील हंगामात ऊस तोडणी दिवाळीनंतर सुरू झाली होती. यंदाही ऊस तोडणी दिवाळीनंतर किंवा पुढील महिन्यात सुरू होईल, अशी स्थिती आहे. वाफसा नसल्याने ऊस तोडणी मजूर ऊस तोडणीसाठी तयार होणार नाहीत. अनेक भागांत मजूर दिवाळी सण साजरा केल्यानंतर ऊस तोडणीचे काम सुरू करण्यासंबंधी सांगत आहेत.

सहा कारखान्यांना प्रतीक्षा

खानदेशात यंदा सहा साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्यात नंदुरबारमध्ये चार व जळगाव जिल्ह्यात दोन कारखाने सुरू होतील. जळगावात चोपडा व मुक्ताईनगर येथे तर नंदुरबारमध्ये नवापूर, नंदुरबार, तळोदा व शहादा येथे साखर कारखाने सुरू होतील.

उसाची लागवड नंदुरबारमध्ये सर्वाधिक झाली आहे. तेथे सुमारे १४ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. जळगाव जिल्ह्यातही सुमारे १२ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. धुळ्यातही शिरपूर, साक्री भागात ऊस पीक आहे. यंदा एकूण गाळप २७ लाख टनांवर अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT