Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : करकंब परिसरात पाऊस

Sugarcane Harvesting : पंढरपूर तालुक्यातील करकंब परिसरात सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झाली आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : पंढरपूर तालुक्यातील करकंब परिसरात सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झाली आहे. शिवाय, या पावसामुळे शेतात चिखल झाल्याने ऊसतोडीवरही परिणाम झाला असून, वीटभट्टी चालकांचेही नुकसान झाले आहे.

करकंब मंडल कार्यालयाकडील नोंदीनुसार, गुरुवारी (३० नोव्हेंबर) रात्री ११ मिलिमीटर तर शुक्रवारी (ता. १) रात्री १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा सर्वात मोठा फटका या भागातील द्राक्षबागांना बसणार आहे.

दोन दिवसांच्या रात्रीच्या पावसानंतर दिवसा ऊन पडत असल्याने डावण्या व भुरी रोगाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर बागांवर प्रतिबंधक कीटकनाशके फवारण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून आली.

वीटभट्टीचालकांची तारांबळ

दुसरीकडे, या पावसाने ऊसतोडीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तोडलेला ऊस वाफशाअभावी शेतातून बाहेर काढणे मुश्किलीचे झाले आहे. बहुतांश ठिकाणी चालू ऊसतोड थांबवून रस्त्यालगतचा ऊस तोडण्यास कारखानदारांनी प्राधान्य दिले आहे.

वीटभट्टी चालकांचीही रात्रीच्या वेळी आलेल्या अवकाळी पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. याशिवाय काढणीस आलेल्या मका, कांदा या पिकांचेही या पावसाने नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi 2026 Sowing : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचे १ हजार ७७७ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट; पावसाच्या तुटीमुळे चिंता वाढली

White Grub Control: उसातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रण

Interview With Prataprao Pawar: दुष्काळातही ‘एआय’ ठरेल फायदेशीर

Cotton Crop Disease: रोगांची लक्षणे ओळखा, वेळीच नियंत्रण करा

Cotton Pest Management: सद्यःस्थितीत कपाशीवर आढळणाऱ्या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT